शाळा सुरक्षितपणे सुरु करण्यासाठी मार्गदर्शक सुचना | Guidelines for starting school safely

0 Mr. Annasaheb Babar

 शाळा सुरक्षितपणे सुरु करण्यासाठी मार्गदर्शक सुचना 

शाळा सुरक्षितपणे सुरु करण्यासाठी मार्गदर्शक सुचाना

   सदर समीतीने शाळा सुरू करण्यापूवी खालील बाबीवर चर्चा करावी.

1) शाळा सुरु करण्यापूवी सबंधित  शहरात / गावात कोविडचा प्रादुभाव कमी झालेला असावा.

2) सर्व शिक्षकांचे व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण करणे आवस्यक आहे. याबाबत जिल्हाधिकार्‍यांनी नियोजन करावे. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद/ आयुक्‍त, महानगरपालिका/मुख्याचिकारी, जिल्हाधिकाऱयांकडे पाठपुरावा करुन १००% लसीकरण करण्यासाठी प्रयत्न

3) विद्यार्थ्याच्या पालकांना गर्दी टाळण्यासाठी झाळेच्या परिसरात प्रवेश देऊ नये.

4) कोविड संबंधी सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. उदा. जास्त विद्यार्थी असलेल्या शाळांमध्ये दोन सत्रांमध्ये, एका बाकावर एकच विद्यार्थी, दोन बाकांमध्ये ६ फुट अंतर, एका वर्गात जास्तीत जास्त १५-२० विद्यार्थी, सतत हात साबणाने घुणे, मास्कचा वापर, कोणतेही लक्षण असल्यास विद्यार्थ्यांना वैद्यकीय अधिकारी अथवा नजीकच्या आरोग्य केंद्रामध्ये पाठविणे.

5) विद्यार्थी कोविडग्रस्त झाल्याचे आढळल्यास तात्काळ शाळा बंद करुन शाळा निर्जतुकीकरण करण्याची कार्यवाही मुख्याध्यापकांनी करुन घ्यावी व विद्यार्थ्याचे विलगीकरण करावे व वैद्यकीय अधिकाऱ्याच्या सह्लाने वैद्यकीय उपचार सुरु करावेत तसेच कोविडय्रस्त विदयार्थ्यांच्या शेजारील वि्या्थयाती सुध्दा कोरोना चाचणी करुन घ्यावी.

6) शाळा सुरू करताना मुलांना टप्पया-टप्प्यात शाळेत बोलविण्यात यावे. उदा. वर्गांना अदला- बदलीच्या दिवशी/ सकाळी-दुपारी, ठराविक महत्वाच्या (core) विषयांसाठी प्राधान्य इ. हयासाठी सोबत जोडलेल्या मार्गदर्शन सूचना (SOP) चे पालन करावे.

7) संबंधीत शाळेतील शिक्षकांनी राहण्याची व्यवस्था शक्यतो त्याच शहरात / गावात करावी किवा त्यांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा शक्यतो वापर न करण्याबाबत दक्षता घ्यावी.

8) वरील सर्व बाबींचे शहरी भागात महानगरपालीका आयुक्‍त व इतर भागात जिल्हाधिकारी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद/ मुख्याधिकारी,नगरपरिषद यांनी शिक्षणाधिकारी, आरोग्य अधिकारी यांच्या समवेत सातत्याने आढावा घेऊन आवझ्यक तेथे संबंधितांना सूचना कराव्यात.

वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण नोंदणी 2022(Click Here)

9) शासन परिपत्रक, दिनांक ७ जुलै, २०२१, दिनांक १० ऑगस्ट, २०२१ नुसार देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांसह दिनांक '२४ सप्टेंबर, २०२१ रोजीच्या परिपत्रकातील अतिरिक्त मार्गदर्शक सूचना एकत्रित करून वरील प्रमाणे शाळा सुरु करण्यासाठी सोबत जोडलेल्या परिश्िष्ट-अ व परिशषिष्ट- ब मध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत, सदर सुचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे,

10) दि. १ डिसेंबर २०२१ पासून ग्रामीण भागातील इयत्ता १ ली ते ४ थी व महानगरपालिका क्षेत्रातील इयत्ता १ ली ते ७ बी च्या विद्यार्थ्यांचे शाळेतील वरिष्ठ वर्गातील विद्यार्थी व शिक्षकांनी स्वागत करुन विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवावा.

11) दि. १ डिसेंबर २०२१ पासून सुरु होत असलेल्या शाळांबाबत विक्षणाविकारी, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी यांनी नियमित शाळांना भेटी देऊन आढावा घेऊन आवश्यक तेथे मार्गदर्शन करावे व भेटीचा अहवाल विभागीय शिक्षण उपसंचालक यांना सादर करावा. विभागीय छपसंचालकांनी एकत्रित अहवाल शिक्षण संचालकांना सादर करावा.

वरील मार्गदर्शक सुसनांव्यतिरिक्त शासनाने कोविड-१९ संदर्भात वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे देखील पालन करण्यात याचे.

अधिक माहितीसाठी खालील शासन निर्णय पहावा.


Tag-cdc guidelines for starting school,tea guidelines for starting school,rules for starting a school,a guide to starting school,guide to starting high school,guide to starting secondary school
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Out
Ok, Go it!
close