शाळा आता उशीरानं सुरु होणार | School will start late now ...
राज्यातील शाळा येत्या 1 डिसेंबरपासून सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला होता. त्यादृष्टीने अनेक जिल्ह्यात तयारीही करण्यात आली होती. पण नव्या विषाणूने पुन्हा चिंता वाढवली आहे. ओमायक्रॉन व्हेरिएंटचा सध्या भारतात धोका नसला तरी खबरदारीचा उपाय म्हणून अनेक जिल्ह्यात उद्यापासून शाळा सुरु करण्याचा निर्णय लांबणीवर टाकल्याचं चित्र आहे.
मुंबई मध्ये पहिली ते पाचवी
पर्यंत च्या शाळा 15 डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय
मुंबई महापालिकेने घेतला आहे. पुण्यात शाळा सुरू करण्याचा निर्णय लांबणीवर पडला. 15
डिसेंबर पर्यंत शाळा सुरू न
करण्याचा निर्णय आयुक्तांच्या बैठकीत घेण्यात आला. नाशिकातील शाळा सुरू करण्याबाबत
10 डिसेंबर नंतर निर्णय घेण्यात येणार आहे. तसेच औरंगाबाद
शहरात शाळांचा निर्णय दहा तारखे नंतरच घेतला जाईल.
If you have any doubts, please let be know.