विद्यार्थ्यांना एसटी पास आता शाळेतच मिळणार

 विद्यार्थ्यांना एसटी पास आता शाळेतच मिळणार



महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एक पाऊल पुढे टाकत विद्यार्थ्यांना शाळेतच पास वितरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना तासिका बुडवून पास काढण्याकरिता आता रांगेत उभे राहावे लागणार नाही. राज्यभरातील लाखो विद्यार्थी, विद्यार्थिनींना याचा फायदा होणार आहे.

खेडेगावातून शाळेत येण्यासाठी शासनाने विद्यार्थ्यांना एसटीच्या माध्यमातून तिकिटात सवलत दिली आहे. केवळ 33 टक्के रक्कम भरून विद्यार्थ्यांना मासिक प्रवास पास काढता येतो. तसेच शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थिनींना मोफत पासचे वितरण केले जाते.

तास बुडवून रांगेत उभारण्याची गरज नाही

पास मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना घरून लवकर निघावे लागते, ते शक्य नसल्यास शाळेतील काही तासिका बुडवाव्या लागतात.

आता शाळेतच पास मिळणार असल्याने विद्यार्थ्यांची धावपळ कमी होणार आहे आणि तासिका सुद्धा बुडणार नाहीत.

ही मोहीम मंगळवार दिनांक 18 जून पासून सुरू होणार

  • एसटी पास थेट तुमच्या शाळेत ही विशेष मोहीम 18 जून पासून एसटी प्रशासनातर्फे राबविण्यात येणार आहे तत्पूर्वी सर्व शाळा महाविद्यालयाचे मुख्याध्यापक आणि प्राचार्यांना एसटीच्या आगार व्यवस्थापकांनी पत्र दिले आहे.
  • शाळेत नवीन वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी तयार ठेवण्याच्या सूचना याद्वारे करण्यात आल्या आहेत.
विद्यार्थ्यांना थेट त्यांच्या शाळेत पास वितरित केला जाणार आहे. त्या दृष्टीने आवश्यक त्या सूचना एसटीच्या स्थानिक प्रशासनाला देण्यात आलेले आहेत. काही शाळा सुरू झालेल्या असल्याने पासेस वितरणासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. 

      .................डॉ. माधव कुसेकर, उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक एसटी महामंडळ

If you have any doubts, please let be know.

थोडे नवीन जरा जुने

ads

ads

نموذج الاتصال

close