विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यास मदत करण्यासाठी ऑनलाईन समुपदेशन (SSC, HSC)

विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यास मदत करण्यासाठी ऑनलाईन समुपदेशन (SSC, HSC)


उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र ( इ. १० वी ) परीक्षेसाठी राज्यमंडळ स्तरावर समुपदेशक नियुक्त केले आहेत.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षा दि. ११/०२/२०२५ ते दि. १८/०३/२०२५ व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र ( इ. १० वी ) परीक्षा दि. २१/०२/२०२५ ते दि. १७/०३/२०२५ या कालावधीत पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या विभागीय मंडळांमार्फत आयोजित करण्यात करण्यात आलेल्या आहेत.

परीक्षेच्या काळात अनेक विद्यार्थी नकारात्मक विचाराने किंवा परीक्षेच्या भितीने मानसिक दडपणाखाली असतात. अशा विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यास मदत करण्यासाठी ऑनलाईन समुपदेशन करण्याकरीता राज्यमंडळ स्तरावरुन समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे भ्रमणध्वनी क्रमांक खालीलप्रमाणे आहेत.

१) ९०११३०२९९७ 

२) ८२६३८७६८९६ 

३) ८७६७७५३०६९ 

४) ७३८७४००९७० 

५) ९९६०६४४४११ 

६) ७२०८७७५११५ 

७) ८१६९२०२२१४ 

८) ९८३४०८४५९३ 

९) ८३२९२३००२२ 

१०) ९५५२९८२११५

उपरोक्त भ्रमणध्वनी क्रमांक दिलेले समुपदेशक लेखी परीक्षेपूर्वी, परीक्षा कालावधीत सकाळी ८-०० ते रात्री ८-०० या कालावधीत विद्यार्थ्यांना भ्रमणध्वनीव्दारे निशुल्क आवश्यक ते समुपदेशन करतील. मात्र विद्यार्थी, पालक यांनी परीक्षा केंद्र, बैठक व्यवस्था व प्रश्नपत्रिकेसंबधित प्रश्न इत्यादींबाबत समुपदेशकांना विचारणा करू नये याची नोंद घ्यावी.

If you have any doubts, please let be know.

थोडे नवीन जरा जुने

ads

ads

نموذج الاتصال

close