२०२५-२६ शैक्षणिक वर्षासाठी नवे पाठ्यपुस्तक धोरण जाहीर

0 Mr. Annasaheb Babar

२०२५-२६ शैक्षणिक वर्षासाठी नवे पाठ्यपुस्तक धोरण जाहीर - बालभारतीचा परिपत्रक

पुणे : महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, ‘बालभारती’ पुणे यांनी शालेय शिक्षण वर्ष २०२५-२६ साठी नव्याने प्रकाशित होणाऱ्या पाठ्यपुस्तकांबाबत महत्त्वाचे परिपत्रक प्रसारित केले आहे. या परिपत्रकात नवीन पाठ्यपुस्तकांची इयत्तेनिहाय यादी, वेळापत्रक, खरेदी प्रक्रिया आणि विविध शाळांसाठी लागू होणारे धोरण स्पष्ट करण्यात आले आहे.


संदर्भाधीन शासन निर्णयान्वये शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी पाठ्यपुस्तकांमध्ये झालेल्या बदलांबाबत माहिती या परिपत्रकाद्वारे कळवण्यात येत आहे.

  1. संदर्भ क्र. २ च्या शासन निर्णयान्वये शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ व त्यापुढे पूर्वीप्रमाणेच नियमित (विषयनिहाय) पाठ्यपुस्तके वह्यांच्या पानांशिवाय उपलब्ध करून दिली जातील.

  2. संदर्भ क्र. ३ च्या शासन निर्णयानुसार राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार तयार करण्यात आलेल्या नवीन अभ्यासक्रमानुसार अभ्यासक्रम आधारित शाळांमध्ये सर्व विभागांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून पाठ्यपुस्तक बदलाची अंमलबजावणी खालीलप्रमाणे करण्यात येत आहे.

इयत्तेनिहाय पाठ्यपुस्तक बदलाचे वेळापत्रक:

शैक्षणिक वर्षज्या इयत्तांचे पुस्तक बदलले जाणार
२०२५-२६इयत्ता १ ली
२०२६-२७इयत्ता २ री, ३ री, ४ थी, ६ वी
२०२७-२८इयत्ता ५ वी, ७ वी, ९ वी, ११ वी
२०२८-२९इयत्ता ८वी, १० वी, १२ वी

  1. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये इयत्ता १ लीसाठी पाठ्यपुस्तके नव्याने प्रकाशित होणार असून, पूर्वीप्रमाणेच नियमित (विषयनिहाय) पाठ्यपुस्तके वह्यांच्या पानांशिवाय उपलब्ध करून दिली जातील. तसेच 'अनुक्रमांक २नुसार राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी होणार आहे. त्या त्या शैक्षणिक वर्षानुसार नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी होणार असल्याचे त्यां-त्या शैक्षणिक वर्षानुसार सदर इयात्ताच्या पाठ्यपुस्तकांची खरेदी करण्यात यावी.

  2. इयत्ता १ ली ते इयत्ता ८ वी पर्यंत सर्व नियमित (विषयनिहाय) पाठ्यपुस्तकें शाखा सुरू होण्यापूर्वी उपलब्ध करून दिली जातील.

  3. इयत्ता १ लीसाठी ‘खेळू-करू-शिकू’ या पाठ्यपुस्तकासाठी शिक्षक हस्तपुस्तिका निर्मिती राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे कार्कयलया मार्फत  करण्यात येणार आहे.

  4. इयत्ता १ लीसाठी ‘खेल खेल में सिखे हिंदी  (मराठी व इंग्रजी माध्यमासाठी) या पाठ्यपुस्तकाबाबत संबंधितांना आवश्यक ते निर्देश कळवण्यात येतील.

  5. मराठी शिवाय अन्य माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता १ लीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘मजेत शिकूया’ मराठी या पाठ्यपुस्तकासाठीही आवश्यक ते निर्देश देण्यात येतील.

  6. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ (जून २०२५) हे इयत्ता २ री, ३ री, ४थी, 6 वी  या इयत्तांच्या पाठ्यपुस्तकांचे शेवटचे वर्ष राहील. त्यानंतर या इयत्तांची पाठ्यपुस्तके खरेदी आवश्यकतेनुसार करण्यात यावी.

  7. इयत्ता २ री ते इयत्ता ८ वीच्या एकात्मिक व नियत पाठ्यपुस्तकांमधील आशय, मूल्यमापन  योजना समान आहेत. तसेच ही दोन्ही प्रकारची पाठ्यपुस्तकें प्रचलित अभ्यासक्रमावर आधारित आहेत. याबाबतची नोंद सर्व संबंधितांनी घ्यावी.

  8. पाठ्यपुस्तक मंडळाचे नोंदणीकृत पुस्तक विक्रेते व शैक्षणिक संस्था यांनी पाठ्यपुस्तकांच्या खरेदीवर १५ टक्के वटाव देण्यात येतो.  दिनांक २६.०३.२०२५ पासून फक्त एकात्मिक पाठ्यपुस्तकांच्या खरेदीवर अधिकचा ५% वटाव देण्यात येईल. सदर रकमेचे समायोजन हंगाम कालावधी संपल्यानंतरकरण्यात येईल.

  9. पाठ्यपुस्तक मंडळाचे नोंदणीकृत पुस्तक विक्रेते व शैक्षणिक संस्था यांचेकडे इयत्ता ३ री  ते ८ वीच्या शिल्लक असलेल्या एकात्मिक पाठ्यपुस्तकांची निवेदने प्राप्त झाल्यास विक्री हंगामानंतर सदरचा विषय नियमक मंडळाच्या सभेत सादर करण्त्यायात येईल. तदनंतर घेतलेल्या निर्णय सर्व संबंधितांना कळवण्यात येईल.


वरील परिपत्रकानुसार पाठ्यपुस्तकांची रचना व बदलांविषयीची नोंद राज्यातील सर्व नोंदणीकृत पुस्तक विक्रेते, शैक्षणिक संस्था व इतर संबंधितांनी घ्यावी.

परिपत्रकाचा संदर्भ:

परिपत्रक क्रमांक : अ/३/६/११२४
दिनांक : १९.०४.२०२५
प्रकाशन दिनांक : २० मे २०२५

संचालक : कृष्णकुमार पाटील
पाठ्यपुस्तक मंडळ, पुणे – ४

टॅग्स:

#बालभारती #नवीनपाठ्यपुस्तक #शालेयशिक्षण२०२५ #SchoolBooksUpdate #MaharashtraEducation #NEP2020

अधिक माहितीसाठी व वेळोवेळी अपडेटसाठी भेट द्या: www.onlineshikshakasb.com

📌 मराठी टॅग्स:

  • #नवेपाठ्यपुस्तक२०२५

  • #शैक्षणिकवर्ष२०२५२६

  • #नवेशालेयधोरण

  • #शैक्षणिकधोरण

  • #महाराष्ट्रशिक्षण

  • #पाठ्यपुस्तकबदल

  • #शिक्षणविभाग

  • #शालेयबदल

  • #विद्यार्थीसाठीमहत्त्वाचे

  • #नवीनअभ्यासक्रम


📌 English Tags (For Reach):

  • #NewCurriculum2025

  • #TextbookPolicyChange

  • #EducationReform

  • #MaharashtraEducation

  • #AcademicYear2025_26

  • #NewSyllabus

  • #TextbookUpdate

  • #SchoolEducationNews

  • #EducationalPolicy2025

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Out
Ok, Go it!
close