दिनांक :२७/१२/२०१९.
सूचना
सूचना
१)उर्दू माध्यमातील रिक्त पदासाठी जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगर पालिका यांची व्यवस्थापननिहाय शिफारस पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे. उमेदवारांच्या लॉगिंवर उपलब्ध करण्यात आलेला नाही. त्यामुळे उमेदवारांनी सर्वसाधारण यादी पहावी. या यादीतील उमेदवारांनी पुढील कार्यवाहीसाठी दि १०/०१/२०२० पर्यंत संबंधित संस्थेत उपस्थित राहून नियुक्ती प्राधिकारी यांचेशी संपर्क साधावा.
ब ) इ ९ वी ते इ १२ वी या गटातील खाजगी संस्थातील रिक्त पदे
१). इ ११ वी ते इ १२ वी या गटातील पदासाठी ज्या उमेदवारांची व्दितीय श्रेणी अपडेट करणे आवश्यक होते तसेच इ ९ वी ते इ १० वी या गटातील प्राधान्यक्रम न आलेल्या सर्व उमेदवारांनी नव्याने प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करणे आवश्यक आहे.
२). ज्या उमेदवारांनी यापूर्वी शैक्षणिक पात्रतेमुळे मुलाखतीसह आणि मुलाखतीशिवाय या दोन्ही प्रकारचे प्राधान्यक्रम लॉक केलेले नाहीत त्यांना नव्याने प्राधान्यक्रम जेनरेट करण्यापूर्वी समांतर आरक्षण विषयक माहिती Self Declaration (Social category And Creamy Layer etc) यावर क्लिक करून Declaration Details समोर क्लिक करून yes साठी टिक करावे त्यानंतर Creamy Layer Details, Social Category Details अन्य तपशील तील माहिती समोर योग्य त्या ठिकाणी टिक करावे त्यानंतर Save बटन वर क्लिक करावे. Save केलेली माहिती योग्य असल्याची खात्री करून येणाऱ्या फॉर्मसमोर Ok वर क्लिक करावे. यामुळे समांतर विषयक माहिती पूर्ण होईल.
३). नव्याने प्राधान्यक्रम भरणाऱ्या उमेदवारांना त्यांच्या समांतर आरक्षणाची ( उदा. महिला,माजी सैनिक ,अंशकालीन ,प्रकल्पग्रस्त ,भूकंपग्रस्त,खेळाडू ,अनाथ इत्यादी ) नोंद एकदाच करता येईल. त्यामुळे उमेदवारांनी एकदा माहिती save केल्यानंतर पुन्हा समांतर आरक्षण दुरुस्त करण्याची सुविधा दिलेली नाही त्यामुळे उमेदवारांनी समांतर आरक्षण विषयक माहिती काळजीपूर्वक नोंद करावी. एकदा माहिती नोंद करून save करून येणाऱ्या फॉर्मसमोर Ok वर क्लिक केल्यानंतर पुन्हा बदल करता येणार नाही.
४). ज्या उमेदवारांच्या शैक्षणिक अर्हतेमध्ये कोणताही बदल करण्याची आवश्यकता नव्हती अशा उमेदवारांनी त्यांचे यापूर्वी लॉक केलेले प्राधान्यक्रम Report या मेनूमध्ये View Locked preferences (Without Interview) मध्ये केवळ इ ९ वी ते इ १२ वी साठीचे दाखविण्यात आलेले आहेत . सदर लॉक केलेले प्राधान्यक्रम यापूर्वी दिलेल्या पसंतीक्रम नुसार दर्शविण्यात आलेले आहेत.
५). वरील अ क्र ४ मध्ये ज्या उमेदवारांना यापूर्वी लॉक केलेल्या प्राधान्यक्रमातील पसंतीक्रमध्ये बदल करावयाचा असल्यास Delete All Preferences Without Interview यावर क्लिक करून पूर्वीचे प्राधान्यक्रम Delete करावेत त्यानंतर Generate, Assign , Confirm Preferences, Lock preferences करावेत.त्यानंतर त्यांना Report मेनू मध्ये जाऊन लॉक केलेले प्राधान्यक्रमाची प्रिंट घेता येईल. ज्या उमेदवारांना प्राधान्यक्रमामध्ये बदल करावयाचे नाहीत त्यांनी विना कारण lock असलेले प्राधान्यक्रम delete करू नयेत.
६). खाजगी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील रिक्त पदासाठी उच्च वयोमर्यादा लागू करण्यात आलेले होती त्यामुळे कमाल वय या कारणास्तव ज्या उमेदवारांना प्राधान्यक्रम देता आलेले नाहीत त्यांना महाराष्ट्र खाजगी शाळातील कर्मचारी (सेवेच्या शर्ती ) नियमावली १९८१ मधील तरतुदीनुसार प्राधान्यक्रम देण्यात येत आहेत. अशा उमेदवारांनी लॉगिन करून त्यांच्या समांतर आरक्षण विषयक माहिती भरावी व प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करावेत.
७). उमेदवारांना दि ०१/०१/२०२० ते दि १०/०१/२०२० या कालावधीमध्ये मुलाखतीशिवाय संस्थांचे माधयमिक आणि उच्च माध्यमिक साठीचे प्राधान्यक्रम लॉक करण्याची सुविधा देण्यात आलेली आहे.
If you have any doubts, please let be know.