विद्यार्थ्यांनी दहावीची तयारी कशी करावी ?

0 Mr. Annasaheb Babar
  सध्या शाळेमधील इयत्ता दहावीच्या सर्व विषयांचा अभ्यासक्रम हा शिकवून झालेला आहे. सध्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न आहेत. अभ्यास कसा करावा?  कितीवेळ करावा? व प्रामुख्याने कोणत्या विषयाला जास्त महत्व द्यावे याविषयी मनामध्ये अनेक प्रश्न येत असतात. याविषयी या लेखामध्ये आपण सविस्तरपणे पाहणार आहोत.

        विद्यार्थ्यांनी  दहावीची तयारी कशी करावी ?    


       प्रामुख्याने विद्यार्थी ज्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष करतात त्या मुद्द्यांविषयी व उपलब्ध सुविधा, साधन सामग्री नुसार दहावीच्या परीक्षेची तयारी खालील मुद्द्यांच्या साह्याने करावी.

१) दहावीचा अभ्यासक्रम

       सर्वप्रथम दहावीच्या अभ्यासक्रमाच्या संदर्भातील सर्व माहिती विद्यार्थ्यांनी करून घेणे गरजेचे आहे. तसेच बदललेल्या अभ्यासक्रमानुसार म्हणजेच कृतीपत्रिका , ॲक्टिविटी व इतर सविस्तर अभ्यासक्रमातील बदल माहित करून घेणे गरजेचे आहे.

२) अभ्यासासाठी आवश्यक पुस्तके

       अभ्यासासाठी आवश्यक असणाऱ्या नोट्स (उदा.  गणित व इंग्रजी विषयासाठी  योग्य मेथडने  व बोर्डाला अपेक्षित असणारे  साहित्य ) जमा करून ठेवावे. जे विषय व घटक अवघड आहेत त्याविषयी स्वतः काढलेल्या नोट्स एकत्रित करून ठेवा. तसेच सूत्रे,व्याकरणा संबंधी साहित्य गोळा करून ठेवावे.

३) वेळापत्रक तयार करा :

      जीवनात कोणत्याही क्षेत्रात यश मिळविण्यासाठी वेळेचे नियोजन करणे ही अतिशय प्रभावी पद्धत आहे. वेळ ही अत्यंत उपयोगी आणि दुर्मिळ सामग्री आहे. विद्यार्थी हा एसएससीमध्ये निवड झालेला किंवा अनुत्तीर्ण असो, प्रत्येकासाठी दिवसभराचे फक्त २४ तास असतात. अव्यावहारिक आणि विसंगत वेळेचे नियोजन टाळावे. विषयानुसार प्रत्येक घटकाचे वैविध्य आणि काठिण्यस्तर यावरून वेळेचे नियोजन करा. त्यानंतर वेळापत्रकाचे पालन करा आणि गरजेनुसार वेळोवेळी वेळापत्रकात बदल करा.

४) नियोजनात्मक अभ्यास :

        जे विषय परीक्षेत कठीण वाटतात आणि वारंवार त्याबाबत प्रश्न विचारले जातात, त्या विषयांवर अधिक भर द्यावा. सोप्या वाटणाऱ्या विषयांना इतर घटकांपेक्षा कमी वेळ द्यावा. या प्रक्रियेत विद्यार्थ्याला  एसएससी परीक्षेत मागील वर्षी विचारल्या गेलेल्या अभ्यासघटकांची यादी करावी लागेल. जुन्या प्रश्नपत्रिकांचा संग्रह करावा. त्यादृष्टीने अभ्यासाची तयारी करावी.

५) शॉर्टकट ट्रिक्स :

      बौद्धिक क्षमता आणि तर्कावर आधारित प्रश्न सोडविण्यासाठी जास्तीत जास्त शॉर्टकट ट्रिक्सचा वापर करावा लागतो. त्यामुळे परीक्षेत वेळ आणि प्रयत्नांची बचत होते. अ‍ॅप्टिट्यूड आणि रिजनिंगमध्ये अनेक विषय आहेत, जे अगदी अल्पवेळेत सोडविणे आवश्यक असते.

६) ऑनलाइन सराव :

      तयारीदरम्यान ऑनलाइन अभ्याससामग्रीची मदत घ्यावी. एसएससी परीक्षेत यश मिळविण्यासाठी आवश्यक अभ्याससाहित्य, मार्गदर्शन आणि विविध शॉर्टकट ट्रिक्ससह जवळपास विविध गोष्टी इंटरनेटवर उपलब्ध आहेत. या ऑनलाइन सामग्रीचा अवश्य वापर करावा.

७) मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका :

       कमीत कमी मागील ५ वर्षांच्या प्रश्नपत्रिका गोळा करा आणि सर्व प्रश्नांचा अभ्यास करा. याद्वारे उमेदवाराला प्रश्नांचे स्वरूप, प्रश्नांची संख्या आणि काठिण्यपातळीचा अंदाज येईल. कधी कधी एसएससीकडून मागील वर्षीचे प्रश्न पुन्हा विचारले जातात. त्यामुळे जुन्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो. अशा प्रकारे तयारी केल्यास संबंधित प्रश्न सोडवून पैकीच्या पैकी गुण मिळविणे शक्य होते.

८) शॉर्ट नोट्स तयार करणे :

      प्रत्येक विषयाचे शॉर्ट नोट्स तयार करणे ही एक उपयुक्त पद्धत आहे. त्यामुळे परीक्षेपूर्वी संबंधित घटकांची उजळणी करता येते. सामान्य ज्ञान आणि इंग्रजी विषयासाठी हे महत्त्वाचे आहे. कारण, यामुळे परीक्षेच्या आधी संबंधित विषयाच्या प्रत्येक घटकाचा अभ्यास होणे शक्य होते.

९)ज्ञानाची कसोटी :

       अभ्यास केलेल्या घटकाचे मूल्यमापन करा. याकरिता दोन पद्धती आहेत एक म्हणजे अभ्यासलेल्या घटकावर प्रश्न सोडविणे आणि दुसरी म्हणजे, ऑनलाइन टेस्ट सिरीजचा सराव करणे. ऑनलाइन टेस्ट सरावामुळे विद्यार्थ्याना वास्तविकरीत्या ऑनलाइन परीक्षेचा अनुभव घेता येतो आणि झालेल्या अभ्यासाचे मूल्यमापन करता येते. या माध्यामातून उणिवांचा शोध घेऊन त्यानुसार अभ्यासात सुधारणा करावी.

१०) जास्तीत जास्त सराव :

       यासंदर्भात एक प्रसिद्ध म्हण आहे – “प्रयत्नांती परमेश्वर”. याशिवाय तुकाराम महाराजांनीही अशक्य ते शक्य करता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे, असे सांगून सरावाचे महत्त्व अधोरेखित केले आहे. त्यामुळे जेवढा शक्य होईल तेवढा जास्त अभ्यास करावा. अभ्यासामुळे कमकुवत घटक पक्के होतात आणि परीक्षेत प्रश्न सोडविताना आत्मविश्वास मिळतो.

     वरील माहिती शिवाय विद्यार्थी उपलब्ध सुविधा आणि सामग्रीनुसार इतर घटकांचाही आधार घेऊन अभ्यास करू शकतात.
                                                                            
                                                                           ....श्री. आण्णासो शंकर बाबर

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Out
Ok, Go it!
close