कलचाचणी व अभिक्षमता चाचणी 2020

 दहावीच्या विद्यार्थ्यांची कल आणि अभिक्षमता चाचणी घेण्याच्या सूचना महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने राज्यभरातील शाळांना केल्या आहेत. त्यानुसार २७ डिसेंबर ते १८ जानेवारी २०२० या काळात या चाचण्या होणार आहेत. ही चाचणी मोबाइल आणि कॉम्युटर अशा दोन्ही पद्धतीने घेता येते. त्यामुळे शाळांना यापैकी कुठली पद्धत सोयीस्कर वाटते त्यानुसार ही चाचणी घेण्याच्या सूचनाही मंडळाने केल्या आहेत.


     कलचाचणी व अभिक्षमता  चाचणी 2020



          राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद आणि श्यामची आई फाऊंडेशन या दोन संस्थांसोबत शिक्षण मंडळाने करार केला आहे. या करारानुसार राज्यातील विविध शाळांमध्ये ही चाचणी घेण्यात येईल. गेल्यावर्षी मोबाइलचा वापर करुन ही चाचणी घेण्यात आली होती. यंदा दोन्ही पद्धतीने ही चाचणी घेण्यात येईल.
           या चाचणीच्या माध्यमातून दहावीला असलेल्या विद्यार्थ्यांचा कल कोणत्या क्षेत्रात आहे हे जाणून घेण्यास पालक तसंच शिक्षकांना मदत होईल. या कलमापन चाचणीनुसार एखाद्या क्षेत्रात आवड असलेल्या विद्यार्थ्याकडे त्याच क्षेत्रात करिअर करण्यासाठी पुरेशा क्षमता आहेत का ? हे पाहण्यासाठी अभिक्षमता चाचणी घेण्यात येतात.
          कल चाचणीनुसार कृषी, कला, वाणिज्य, ललित कला, आरोग्य विज्ञान, तांत्रिक, गणवेशधारी सेवा या सात क्षेत्रामधील अभिरुचीचं मापन केलं जाईल. अभिक्षमता चाचणी भाषिक, सांख्यिकीय, अवकाशीय आणि तार्किक या ४ क्षमतांचं मापन करते. या चाचणीसाठी वेळेची मर्यादा आहे. भाषिक क्षमता परीक्षणासाठी १५ मिनिटे व तार्किक, अवकाशीय, सांख्यिकीय क्षमता परीक्षणासाठी प्रत्येकी २० मिनिटे दिली आहेत.

पहिल्या लॉगीनच्या वेळी पासवर्ड बदलणे आपल्या सोयीचे होईल. 

टीप : आपण एकदाच पासवर्ड बदलू शकता, त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांची चाचणी होईपर्यंत पासवर्ड बदलता येणार नाही.

                                                     

A)  शाळा लॉगीन करण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा व
                                                                १) चाचणी दिलेले विद्यार्थी
                                                                २) चाचणी न  दिलेले विद्यार्थी
                                                                ३) हजेरी पत्रक डाऊनलोड करा
                                                                ४) Student list डाऊनलोड करा

शाळा लॉगीन

Β) दहावीच्या विद्यार्थ्यांनी  कल व अभिक्षमता  चाचणी २०१९-२०  सुरु करण्यासाठी खालील चित्रावर Click करा व ऑनलाईन   चाचणी आत्ताच  पूर्ण करा.

( शाळेचा Index क्रमांक  व पासवर्ड तुमच्या  शिक्षकांकडून भरून घेऊन  लॉगीन करा . तसेचअप्लिकेशन नंबर किंवा स्वताचे नाव टाकून सर्च   करा व  तुमची कल चाचणी पूर्ण करा. )
 कल चाचणी






   

If you have any doubts, please let be know.

थोडे नवीन जरा जुने

ads

ads

نموذج الاتصال

close