Pavitra Portal


                                                                                                         दिनांक :१३/१२/२०१९.
                                             
                                     सूचना
                   खाजगी शाळातील इ ९ वी ते इ १२ वी नियुक्ती बाबत
. मा.उच्चन्यायालय,खंडपीठ नागपूर येथील याचिका क्र ४०७९/२०१९ मध्ये दिलेल्या निर्णयानुसार ज्या उमेदवारांना ५० टक्केपेक्षा कमी गुण असल्यामुळे प्राधान्यक्रम आलेले नाहीत अशा उमेदवारांना प्राधान्यक्रम देण्यासाठी श्रेणीची माहिती घेण्याची कार्यवाही सुरु करण्यात येत आहे.

२. खाजगी शाळातील इ ९ वी ते इ १० वी या गटातील खुला प्रवर्ग उमेदवारांना ५० टक्के व मागासवर्गीय उमेदवारांना ४५ टक्केपेक्षा कमी गुण असल्यामुळे प्राधान्यक्रम देण्यात आलेले नाहीत त्यातील उत्तीर्ण श्रेणी असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्यक्रम देण्यात येणार आहेत. इ ९ वी ते इ १० वी या गटातील उमेदवारांकडून त्यांच्या पदवी स्तरावरील श्रेणीची माहिती घेण्यात येणार नाही. अशा उमेदवारांना प्राधान्यक्रम देण्यात येतील त्यांनी दिलेले प्राधान्यक्रम विहित कालावधीत लॉक करावेत.

३. खाजगी शाळातील इ ११ वी ते इ १२ वी या गटातील खुला प्रवर्ग उमेदवारांना ५० टक्के व मागासवर्गीय उमेदवारांना ४५ टक्केपेक्षा कमी गुण असल्यामुळे प्राधान्यक्रम देण्यात आलेले नाहीत त्यांनी पदव्युत्तर पदवीच्या विषयातील (Post Graduate) प्राप्त श्रेणी हि किमान व्दितीय श्रेणी उत्तीर्ण असल्यास विचारलेल्या माहिती समोर Yes म्हणावे. ज्या ज्या पदव्युत्तर पदवी च्या विषयामध्ये खुला प्रवर्ग उमेदवारांच्या बाबतीत ५० टक्के व मागासवर्गीय उमेदवारांना ४५ टक्केपेक्षा कमी गुण असतील अशा पदव्युत्तर पदवी ची माहिती विचारली जाईल. ती योग्य ती माहिती नमूद करून save करावी आणि save केलेली माहिती आपल्या Profile मध्ये योग्य आलेली आहे ती Profile मध्ये जाऊन तपासून पाहावी.

४. उमेदवारांच्या श्रेणीची माहिती केवळ पदव्युत्तर पदवी मध्ये पूर्वीच्या निकषांपेक्षा कमी गुण असणाऱ्या उमेद्वाराकडूनच माहिती मागविण्यात येत आहे. त्यामुळे अन्य उमेदवारांनी त्यांच्या श्रेणीची माहिती देण्याची आवश्यकता नाही त्यामुळे अन्य उमेदवारांनी विचारणा करू नये.

५. पदव्युत्तर पदवीच्या विषयातील (Post Graduate) प्राप्त श्रेणी ची माहिती घेतल्यानंतर इ ९ वी ते इ १० वी व इ ११ वी ते इ १२ वी या गटातील पात्र उमेदवारांना मुलाखतीसह व मुलाखतीशिवाय प्राधान्यक्रम दिले जातील त्यांनी दिलेल्या विहित मुदतीत प्राधान्यक्रम लॉक करावेत.

६. इ ११ वी ते इ १२ वी या गटातील पदासाठी श्रेणीची माहिती दि १६/१२/२०१९ ते दि २२/१२/२०१९ या कालावधीत पूर्ण करावी.


पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरतीच्या दुस-या टप्प्यामध्ये उमेदवारांच्या नियुक्तीसाठी शिफारस करण्याची निवड यादी प्रसिद्ध करण्याचा क्रम खालीलप्रमाणे असेल.

१.बृहन्मुंबई मनपा शाळा (सुधारित यादी)
२. उर्दू माध्यमाच्या शाळांतील रिक्त राहिलेली पदे
३. मा. उच्चन्यायालय, नागपुर यांचे आदेशानुसार इ. ९ वी ते इ. १ २ वी खाजगी संस्थांमधील पदांची निवड यादी
४. वरील सर्व निवड यादी व्यतिरिक्त रिक्त राहिलेल्या माजी सैनिक प्रवर्गातील रिक्त पदांची निवड यादी
५. मुलाखतीसह खाजगी संस्थामधील पदांसाठीची निवड यादी
वरील क्रमाने प्रसिद्ध होणा-या निवड यादीत उमेदवारांची एकदा शिफारस झाल्यास पुढील कुठल्याही यादीत त्यांचा निवड प्रक्रियेसाठी विचार होणार नाही, याची उमेदवाराने नोंद घ्यावी.


अ)बृहन्मुंबई महानगरपालिकेची पद भरती :

१. पवित्र पोर्टल वर प्रत्येक व्यवस्थापनासाठी माध्यम निहाय रिक्त पदे नोंद करण्याची सुविधा आहे.परंतु,बृहन्मुंबई महानगर पालिकेकडे इंग्रजी एकाच माध्यमाच्या मुंबई पब्लिक स्कुल (MPS ) व प्राथमिक शिक्षण विभाग (UPS) या दोन प्रकारच्या शाळा असल्याने इंग्रजी या एकाच माध्यमामध्ये नोंद केल्यामुळे एकत्रित निवड यादी प्रसिद्ध झालेली आहे. त्यामुळे नियुक्ती प्राधिकारी यांनी मुंबई पब्लिक स्कुल (MPS ) साठी उपलब्ध झालेले उमेदवार वगळून दोन्ही शाळांतील उर्वरित रिक्त पदासाठी स्वतंत्र निवड यादी देण्याची मागणी केलेली आहे. सदर बाब विचारात घेता महानगरपालिकेने दोन्ही शाळा प्रकारासाठी दिलेली बिंदुनामावली व विषय स्वतंत्रपणे नोंद करून यापूर्वी ज्या उमेदवारांनी प्राधान्यक्रम दिलेले आहेत त्यांच्या शैक्षणिक व व्यावसायिक पात्रतेनुसार मुंबई पब्लिक स्कुल (MPS ) साठी संपूर्ण शिक्षण इंग्रजी माध्यमातून झालेले उमेदवार पात्र राहतील. प्राथमिक शिक्षण विभाग (UPS) साठी केवळ डीएड /बीएड इंग्रजी माध्यमातून उत्तीर्ण झालेले उमेदवार/संपूर्ण शिक्षण इंग्रजी माध्यमातून झालेले उमेदवार पात्र राहतील. त्यानुसार मुंबई पब्लिक स्कुल (MPS ) व प्राथमिक शिक्षण विभाग (UPS) यासाठी दोन स्वतंत्र याद्या तयार करण्यात येत आहेत.
संपूर्ण शिक्षण इंग्रजी माध्यमातून उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचा विचार प्रथम इंग्रजी माध्यमातील मुंबई पब्लिक स्कुल (MPS ) शाळांसाठी केला जाईल. असा विचार केल्यानंतर निवड न झालेल्या उमेदवारांना इतर उमेदवारांसहीत प्राथमिक शिक्षण विभागाच्या (UPS)रिक्त पदांसाठी विचारात घेतले जाईल. वरील प्रक्रीयेनुसारच उमेदवाराने ‍ दिलेल्या प्राधान्यक्रमाचा विचार केला जाईल.

ब) उर्दू माध्यम रिक्त पदे

१. पवित्र प्रणाली अंतर्गत दि०९/०८/२०१९रोजी नियुक्तीस शिफारस पात्र उमेदवारांची निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली. त्यानंतर उर्दू माध्यमाच्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व अन्य प्रवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी उमेदवार उपलब्ध नसल्याने सदर रिक्त पदे खुल्या प्रवर्गातून भरण्यासाठी शासनाने परवानगी दिलेली आहे.

२. शिल्लक राहिलेली समांतर आरक्षणासह आरक्षित पदे खुल्या प्रवर्गामध्ये समांतर आरक्षणा सह दर्शविण्यात आलेली आहेत त्यामुळे खुला प्रवर्ग विचारात घेऊन पात्र उमेदवारांना प्राधान्यक्रम देण्यात येणार आहेत.

3.ज्या उमेदवारांची यापूर्वीच्या दि.०९/०८/२०१९ च्या निवडयादी मध्ये शिफारस झालेली नाही. अशा सर्व पात्र उमेदवारांना पुन्हा प्राधान्यक्रम भरणे आवश्यक आहे. त्याशिवाय उमेदवाराचा शिल्लक ‍रिक्त पदावरील पद भरतीसाठी विचारात घेतले जाणार नाही.

४.यापूर्वी दिलेले प्राधान्यक्रम प्रथम निवड यादीसाठी विचारात घेण्यात आलेले आहेत.त्यामुळे यापूर्वीचे प्राधान्यक्रम विचारात घेऊन कार्यवाही पूर्ण झालेली आहे. उर्वरीत रिक्त पदे खुल्या प्रवर्गातून नव्याने भरण्यात येणार असल्यामूळे पात्र सर्व उमेदवारांकडून नव्याने प्राधान्यक्रम मागविण्यात येत आहेत. त्यामुळे पात्र सर्व उमेदवारांनी रिक्त पदांसाठी नव्याने प्राधान्यक्रम देणे आवश्यक आहे.

५.सदर उर्दू माध्यमातील रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारा कडून प्राधान्यक्रम मागविण्यात येणार आहेत. ज्या उमेदवारांचे शिक्षण उर्दू माध्यमातून झालेले आहे त्यांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार प्राधान्यक्रम उपलब्ध होतील. प्राधान्यक्रम मागविण्याचा कालावधी पोर्टलवर कळविण्यात येईल .

६. दि.०९/०८/२०१९ रोजी प्रसिद्ध केलेल्या यादी नंतर प्रवर्ग निहाय रिक्त राहिलेल्या समांतर आरक्षणातील जागा खुल्या प्रवर्गातील समांतर आरक्षणा मध्ये नमूद करण्यात आलेल्या आहेत. समांतर आरक्षण व PURE प्रवर्गातील पदे विचारात घेऊन शिफारस पात्र उमेदवारांची पहिली निवड यादी प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानंतर समांतर आरक्षणातील उमेदवार उपलब्ध न झाल्यामुळे समांतर आरक्षणातील रिक्त राहणारी पदे PURE प्रवर्गा मध्ये रूपांतरित करून उर्वरित सर्वच उमेदवारांना विचारात घेऊन स्वतंत्रपणे शिफारसपात्र उमेदवारांची दुसरी निवडयादी प्रसिद्ध करण्यात येईल. पहिल्या यादी मध्ये शिफारस केलेल्या उमेदवारांना दुस-या यादीमध्ये Betterment चा पर्याय राहणार नाही याची नोंद घ्यावी. वरील बाब विचारात घेवूनच प्राध्यान्यक्रम द्यावेत .

७.पद भरतीसाठी उपलब्ध होणारी खुला प्रवर्गातील समांतर आरक्षणनिहाय ,गट, विषयनिहाय शिल्लक रिक्त पदे उमेदवारांना पवित्र पोर्टल च्या होम पेजवर Management-wise urdu medium vacant Post या Menu अंतर्गत Zilla Parishad, Mahanagarpalika,NagarPalika यावरClick करून त्या त्या व्यवस्थापनाच्या शिल्लक रिक्त पदाची स्थिती पाहता येईल.

८. बृहन्मुंबई महानगरपालिका व खाजगी संस्थातील (मुलाखती शिवाय पर्याय निवडलेल्या) इ. ९ ते इ. १२ साठीची या पूर्वीची निवड यादी सुधारित होणार असल्याने या संस्थांमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना उर्दू माध्यमासाठी पात्र असल्यास त्यांना प्राध्यान्यक्रम देण्यात येणार आहेत.

९. उर्दू माध्यमातील माजी सैनिकांची सर्व रिक्त पदे खुल्या प्रवर्गातील PURE प्रवर्गामध्ये रुपांतरीत करण्यात आलेली आहेत.

0.उमेदवारांनी प्राधान्यक्रम लॉक केल्यांनतर (मोबाईल क्रमांकावर OTP प्राप्त झाल्यानंतर लॉग आऊट करण्यापूर्वी) Report Menu मध्ये जाऊन लॉक केलेल्या प्राधान्यक्रमाची स्वतःच्या माहितीसाठी प्रिंट कॉपी स्वतःकडे ठेवावी.

क) खाजगी शाळातील इ ९ वी ते इ १२ वी नियुक्ती बाबत

१. मा.उच्चन्यायालय,खंडपीठ नागपूर येथील याचिका क्र ४०७९/२०१९ मध्ये दिलेल्या निर्णयानुसार ज्या उमेदवारांना ५० टक्केपेक्षा कमी गुण असल्यामुळे प्राधान्यक्रम आलेले नाहीत त्यांना महाराष्ट्र खाजगी शाळातील कर्मचारी (सेवेच्याशर्ती ) नियमावली१९८१ नुसार खाजगी माध्यमिक शाळेसाठी उत्तीर्ण आणि उच्च माध्यमिक शाळेसाठी किमान व्दितीय श्रेणी असणा-या उमेदवारांना प्राधान्यक्रम देऊन या उमेदवारांसह यापूर्वी प्राधान्यक्रम दिलेले उमेदवार यांची जाहिराती नुसार आरक्षण,विषय, प्राधान्यक्रम विचारात घेऊन गुणवतेनुसार इ. ९ वी ते इ १२वी या गटासाठी सुधारित शिफारस पात्र यादी तयार करण्यात येणार आहे.

२. यापूर्वी मुलाखतीशिवाय निवडीसाठी खाजगी व्यवस्थापनाच्या इ ९ वी ते इ १२ वी ची दि ०९/०८/२०१९ रोजी प्रसिद्ध केलेली शिफारस पात्र यादी रद्द करण्यात येत आहे.

३. ज्या उमेदवारांना या पूर्वी इ. ११ वी ते इ. १२ वी या गटासाठी ५० टक्केपेक्षा कमी गुण असल्यामुळे प्राधान्यक्रम आलेले नाहीत त्यांच्या पदव्युत्तर पदवीच्या श्रेणीची माहिती यापूर्वी पोर्टलवर घेण्यात आलेली नसल्यामुळे केवळ अशा उमेदवारांकडून किमान व्दितीय श्रेणीत उत्तीर्ण असल्याची माहिती घेण्यात येणारआहे.

४. त्यानंतर या माहितीच्या आधारे उमेदवारांच्या शैक्षणीक अर्हतेमध्ये इ.९वीतेइ. १०वी या गटातील पदांसाठी पदवीमध्ये उत्तीर्ण परंतु, ५० टक्केपेक्षा कमी गुण असणा-या उमेदवारांकडुन मुलाखतीसह/मुलाखतीशिवाय पदांसाठीचे प्राधान्यक्रम घेण्यात येतील.

५. त्याचप्रमाणे इ. ११वी ते इ १२वी या गटातील पदांसाठी पदव्युत्तर पदवीमध्ये व्दितीय श्रेणी असणा-या परंतु, ५० टक्के पेक्षा कमी गुण असणा-या उमेदवारांकडुन मुलाखतीसह/ मुलाखतीशिवाय पदांसाठीचे प्राधान्यक्रम घेण्यात येतील.

६. ज्या उमेदवारांनी यापूर्वी प्राधान्यक्रम लॉक केलेले आहेत. त्यांनी पुन्हा नव्याने प्राधान्यक्रम देण्याची आवश्यकता नाही.

७. खासगी संस्थांकडून मुलाखतीशिवाय निवड करण्यासाठी संस्थांची यापूर्वी पोर्टलवर नोंद केलेल्या बिंदु नामावलीतून इ. १ ली ते ८ वी गटातील निवड केलेली पदे वगळून इ ९वी ते १२ वी साठी पदे पोर्टलवर सुधारित करणे आवश्यक आहे. त्याप्रमाणे करण्यात येईल .
८. वरील प्रक्रीयेसाठी पवित्र पोर्टलवर आवश्यक सुविधा झाल्यानंतर श्रेणीची माहिती भरण्याचे/ प्राध्यान्यक्रम देण्याचे वेळापत्रक स्वतंत्रपणे देण्यात येईल.

ड ) माजी सैनिक या समांतर आरक्षणातील रिक्त पदे भरण्याबाबत

१. माजी सैनिक या समांतर आरक्षणातील उमेदवार उपलब्ध न झाल्यामुळे या रिक्त जागा त्या त्या सामाजिक प्रवर्गातील PURE मधून भरण्यासाठी शासनाची परवानगी मिळाल्यानंतरच प्रत्यक्ष निवड यादी प्रसिद्ध करण्यात येईल. तोपर्यंत खालील प्रमाणे कार्यवाही करण्यात येईल.( उर्दू माध्यमासाठी स्वतंत्र सूचना दिलेल्या आहेत. )

२. त्या त्या सामाजिक आरक्षणातील माजी सैनिक या समांतर आरक्षणाचे उमेदवार उपलब्ध नसल्याने सदर रिक्त पदे त्यात्या सामाजिक आरक्षणातील PURE मधून गुणवत्तेनुसार भरण्यात येणार आहेत.

३. दि ०९/०८/२०१९ रोजी प्रसिद्ध झालेल्या यादीमध्ये समांतर आरक्षणातील काही पदांसाठी शिफारस न झालेल्या काही उमदेवारांकडुन निवेदने प्राप्त झाली होती. सदर निवेदने तपासण्यात आलेली आहेत. त्यावर योग्य कार्यवाही करण्यात येत आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांची निवडीसाठी शिफारस करण्यात येईल.

इ) मुलाखतीसह पदभरती
१. वर नमूद केलेली कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर उर्वरीत उमेदवारांमधून खाजगी संस्थातील मुलाखतीसह पदभरती पर्याय निवडलेल्या संस्थांसाठी एका पदासाठी उपलब्धतेनुसार १० उमेदवार या प्रमाणात व एका उमेदवारास गुणवतेनुसार जास्तीत जास्त १० पदासाठी मुलाखतीद्वारे निवडीसाठी शिफारस करण्यात येईल.
-------*******-------

If you have any doubts, please let be know.

थोडे नवीन जरा जुने

ads

ads

نموذج الاتصال

close