मराठी कोडी व उत्तरे | Latest Puzzles in Marathi -2

या लेखामध्ये मी 20 मजेदार मराठी कोडी तुमच्यासाठी दिलेली आहेत. बघूया तुम्हाला  किती कोड्यांची उत्तरे माहिती आहेत.  
मराठी कोडी व उत्तरे


१)वडिलांनी मुलीला 1 भेट वस्तू दिली आणि सांगितले कि तुम्हाला भूक लागली असेल तर खा.
तहान लागल्यास प्या आणि सर्दी झाल्यास जाळून टाका. मग ती भेट वस्तू काय असेल?

२)दोन अक्षरांचे माझे नाव, डोकं झाकणे माझं काम?
ओळखा पाहू मी कोण?

३) अशी कोणती गोष्ट आहे जी एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाते परंतु एका ठिकाण वरून हालत नाही?

४) मी आयुष्यात एकदाच येतो, मी परत परत येत नाही.
जो मला ओळखत नाही त्याला आयुष्यभर पश्चात्ताप होतो?

५) मी हिरवा आहे पण मी पान नाही. मी अनुकरण करणारा आहे परंतु मी वानर नाही.
सांगा पाहू मी कोण?

६) कोणते फळ आहे जे कच्चे असताना गोड लागते आणि पिकल्यावर ते आंबट होते?

७) अशी कोणती गोष्ट आहे जी थंडी मध्ये सुद्धा वितळते?

८) . माझ्याकडे डोळे नाहीत, परंतु कोणी ऐके काळी मी पाहू शकत होतो तसेच कोणी एके काळी मी विचार सुद्धा करू शकत होतो. पण आता मी पाहू नाही शकत आणि मी आता पूर्ण रिकामा झालेलो आहे सांगा पाहू मी कोण?

९)मला डोळा आहे पण पाहू शकत नाही?

१०) एक माकड, गिलहरी आणि एक पक्षी नारळाच्या झाडावर जोराने धावत होते मग सांगा पाहू सगळ्यात प्रथम केळी कोणाला भेटतील?

११) . सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार किंवा रविवार हे शब्द न वापरता आपण सलग तीन दिवसांची नावे सांगू शकता का?

१२) एका हिरव्या घराच्या आत एक पांढरे घर आहे.
पांढऱ्या घराच्या आत लाल घर आहे.
लाल घराच्या आत बरीच लहान मुले आहेत.
ओळख पाहू मी कोण?

१३) तीन अक्षरांचे ज्याचे नाव, उलट असो किव्हा सरळ, प्रवासाचे आहे मुख्य साधन,असेल हिम्मत आर सांगा त्याचे नाव?

१४) पंख नाही, तरीही ते हवेत उडते, हात नाही तरीही भांडते. सांगा पाहू मी कोण?

१५) जर रमेश सीनाचे वडील आहेत तर मग रमेश सीनाच्या वडिलांचे............ आहे?

१६) अशी कोणती गोष्ट आहे जी नेहमीच वाढते पण कधीही कमी होत नाही?

१७) असा कोणता महिना आहे ज्या महिन्यात लोक कमी झोपतात?

१८) असा कुठला खजिना आहे जो जेवढा लुटू तेवढा वाढत जातो?

१९) अशी कोणती गोष्ट आहे ज्याला पाणी प्यायला दिल्याने ते मरून जाते?

२०) प्रत्येकाच्या सोबत मी असते तुम्ही जिथे जाईल तिथे मी येते , तर मी कोण ?
उत्तरे
    १)    नारळ
    २)    टोपी
    ३)    रस्ता
    ४)    संधी / Opportunity
    ५)    पोपट
    ६)    अननस
    ७)    मेणबत्ती
    ८)    कवटी
    ९)    ऊस
    १०)  कोणालाच नाही कारण नारळाच्या झाडावर केळी येत नसतात.
१  ११)    काल, आज आणि उद्या
    १२)  कलिंगड, हिरवे घर - वरील बाजू, पांढरे घर - त्यापुढील बाजू, लाल घर आणि त्यात खूप साऱ्या कलिंगडाच्या बिया
    १३)  जहाज
    १४)  पतंग
    १५)  नाव
    १६)   वय
    १७) फेब्रुवारी महिना.
    १८)  ज्ञानाचा कोष.
    १९ आग
    २०)  एक सावली
    

          मराठी कोडी व उत्तरे | Latest Puzzles in Marathi -१


         मराठी कोडी व उत्तरे | Latest Puzzles in Marathi -३


     मराठी कोडी व उत्तरे | Latest Puzzles in Marathi -४
टिप्पणी पोस्ट करा

If you have any doubts, please let be know.

थोडे नवीन जरा जुने

POST ADS1

POST ADS 2

">Responsive Advertisement
close