मराठी कोडी व उत्तरे | Latest Puzzles in Marathi -4

या लेखामध्ये मी १0 मजेदार मराठी कोडी तुमच्यासाठी दिलेली आहेत. बघूया तुम्हाला  किती कोड्यांची उत्तरे माहिती आहेत.  

मराठी कोडी व उत्तरे | Latest Puzzles in Marathi -4

) कधी आनंदाचे,कधी दुःखाचे

    कधी अपेक्षित , कधी अनपेक्षित

    कधी गावातून ,कधी

    कधी देशातून कधी परदेशातून

    गावोगाव चालू असत ह्याच मिरवण

    तिकीट घेवून ऐटीत,लाल गाडीतून फिरणं

    फोनमुळे आता फारसं विचारत नाही कुणी

    काळजाचा तुकडा हा फार आहे गुणी

    ओळखा कोण?


२) डोक्यावर तुरा असतो

    कृष्णाच्या मुकुटावर सजतो

    आकाशात काळे मेघ दाटले

    थुई थुई नाचण्यास पाऊल टाकले

    पावसाचे स्वागत करतो छान

   राष्ट्रीयपक्षी म्हणून घेतो मान

   ओळखा कोण?


३) आभाळात उडतो पण पक्षी नाही

    लांबलचक शेपूट पण वाघ नाही

    वेगवेगळे आकार ,निरनिराळे रंग

    मला उडवताना लहान थोर दंग

   चढाओढीच्या वेळी नीट ठेवा भान

   मकरसंक्रांतीच्या दिवशी मला खरा मान

   ओळखा कोण?


४) हिरव्या रानी पानोपानी

   मध्ये कोण बसलंय,राजा का राणी?

   काटेदार अंग ,डोक्यावर तुरा

   हळूच जरा सांभाळून धरा


) पंख आहे पण पक्षी नाही

    जादू करते पण जादुगार नाही

    प्रेमळ आहे पण आई नाही

   म्हटलं तर आहे ,म्हटलं तर नाही

   गोष्टीची पुस्तक वाचा तर खरी

   स्वप्नात येइल मग तुमच्या घरी

   ओळखा कोण?


६) कोकणातून येतो

     देश विदेशात जातो

     मोठेही याला बघून होतात लहान

    सा याचा महिमा महान

    पिवळा,केशरी रंगाचा

    हा तर आहे फळांचा राजा

    ओळखा कोण?


) भर उन्हाळ्यात, हिरव्यागार रानात

    पांढऱ्या मातीत ,लाल ढेकळ

    त्यावर पेरल्या काळ्या बिया

   खाल्लं तर मिळेल थंडावा

   अशी ह्या फळाची किमया

   ओळखा कोण?


८) हिरवी हिरवाई ,हिरवागार रंग

    इटूकले ,पिटुकले ,क्षीदार अंग

    औषधाचा गडू , पण चवीला कडू

    ओळखा कोण?


९) भाळात दाटी ,रंगबेरंगी पतंगाची

    प्रत्येकाला घाई तिळगुळ वाटण्याची

   आज होते सूर्याचे ,मकर राशीत संक्रमण

   'गोड बोला' असा मंत्र देणारा हा एक सण

   ओळखा कोण?


१०) मुकुट याच्या डोक्यावर

    जांभळा झगा अंगावर

   काटे आहेत जरा सांभाळून

   चवीने खातात मला भाजून

   ओळखा कोण?

उत्तर

१] पत्र

२] कलिंगड

३] पतंग

४] अननस

५] परी

६] आंबा

७] मोर

] कडूलिंब

] मकरसंक्रांत

१०] वांग

    मराठी कोडी व उत्तरे | Latest Puzzles in Marathi -१


    मराठी कोडी व उत्तरे | Latest Puzzles in Marathi -२



     मराठी कोडी व उत्तरे | Latest Puzzles in Marathi -३




1 टिप्पण्या

If you have any doubts, please let be know.

थोडे नवीन जरा जुने

POST ADS1

POST ADS 2

">Responsive Advertisement
close