मराठी कोडी व उत्तरे | Latest Puzzles in Marathi -3

मराठी कोडी व उत्तरे | Latest Puzzles in Marathi -3

           या लेखामध्ये 20 मजेदार मराठी कोडी दिलेली आहेत. बघुया तुमच्या किती कोड्यांची उत्तरे बरोबर येतात.
Latest Puzzles in Marathi -3
Latest Puzzles in Marathi -3

1) अंथरूण केलं, पांगरुन घेतलं, डबकं कुठे गेलं ?

2) प्रश्न असा आहे की उत्तर काय?

3)  दोन भाऊ शेजारी, भेट नाही जन्मांतरी.असं काय?

4)  सगळे गेले रानात, झिपरी पोरगी घरात. असं काय?

5)  एवढस कार्ट,  घर कसं  राखत. असं काय?

6) काट्याकुट्याचा बांधला भारा कुठे जातोस ढवूण्या पोरा. असं
     काय?

7) पुरुष असून पर्स वापरतो, वेडा नसून कागद फाडतो. असा
     कोण?

8) पाटील बुवा राम राम,  दाढी मिशा लांब लांब. असं काय?

9)  तीन पायांची तिपाई,  वर बसला शिपाई. असं काय?

10) पाय असून चालत नाही, हात असून काम नाही, पाठ असून टेकत नाही ओळखा पाहू मी कोण?

11) खजिन्याला एका कुलूप ना कडी कितीही धन लूटा, वाढे घडीघडी

12) हिरवी पेटी काट्यात पडली, उघडून पाहिली तर मोत्याने
       भरली. असं काय?


13) मुकुट याच्या डोक्यावर, जांभळा   झगा अंगावर. असं
       काय?

14) सोन्याची सुरी भुईत पुरी, वरती हिरवी झालर मजा करी.
      असं काय?

15) आटंगण पटांगण  लाल लाल रान, अन् बत्तीस
      पिंपळाना एकच पान. असं काय?

16) कोकणातून आला भट, धर की आपट. असं काय?

17) पाणी नाही, पाऊस नाही, तरी रान कस हिरव, कात
        नाही चुना, तरी तोंड कसं रंगल. असं कोण ?

18) कांड्यावर कांडी सात कांडी,  वरती पांढरे मोती. असं
       काय?

19) कोकणातनं आली नार, तिचा पदर हिरवा गार, तिच्या
      कमरेला पोर.  असं काय?

20) तीन जण वाढायला, बारा जण जेवायला. असं काय?

               उत्तरे

1) उशी
2) दिशा
3) डोळे
4) केरसुनी
5) कुलूप
6) फणस
7) कंडक्टर
8) कणीस
9) चूल व तवा
10) खुर्ची
11)  ज्ञान
12) भेंडी
13) वांग
14) गाजर
15) तोंड  (दात आणि जीभ)
16)  नारळ
17) पोपट
18)  ज्वारीचे कणीस
19) काजू
20) घड्याळ


टिप्पणी पोस्ट करा

If you have any doubts, please let be know.

थोडे नवीन जरा जुने

POST ADS1

POST ADS 2

">Responsive Advertisement
close