शाळा सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मोठा निर्णय || Big decision about starting school ज्या ठिकाणी इंटरनेटचे...
शाळा सुरू
करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मोठा निर्णय || Big decision about starting school
ज्या ठिकाणी इंटरनेटचे
कनेक्टिव्हिटी नाही अशा भागात सोशल डिस्टन्सिंग पाळून शाळा सुरू करण्यात याव्यात.
असे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मांडले.
ज्या ठिकाणी फिजीकल
शाळा सुरू करणे अडचणीचे आहे त्या ठिकाणी
ऑनलाइन शिक्षण किंवा इतर पर्याय व्यवस्था करून शिक्षण चालू ठेवावे असा महत्वाचा
निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या शिक्षण विभागाच्या महत्वाच्या
बैठकीत घेण्यात आला.
शालेय शिक्षणासंदर्भात आज मा. उद्धवजी ठाकरे साहेब, मुख्यमंत्री यांनी प्रातिनिधिक तज्ज्ञांची मते ऐकून घेतली. याप्रसंगी डॉ. रघुनाथ माशेलकर , श्री. बच्चु कडू , राज्यमंत्री व विभागाचे वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते. @CMOMaharashtra @INCIndia #keepLearning #elearning pic.twitter.com/rioOvNGMEW— Varsha Gaikwad (@VarshaEGaikwad) May 31, 2020
जून पासून शाळा जरी
सुरू करण्यात येणार नसल्या तरी शैक्षणिक वर्ष मात्र सुरू करण्यात
येणार आहे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
आरोग्याची काळजी घेऊन
ज्या ठिकाणी शाळा सुरू करता येतील तिथे चालू करणे आणि जिथे ऑनलाईन पद्धतीने शिक्षण
देता येते त्याठिकाणी ते चालू ठेवणे. कुठल्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक
वर्ष वाया जाऊ देणार नाही असे मत
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले.
ज्या शाळा क्वारंटाईन
साठी वापरण्यात आलेल्या होत्या, त्या शाळा सुरू होण्यापूर्वी शासन खर्चाने
निर्जंतुकीकरण केल्या जातील असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
COMMENTS