एप्रिल - मे २०२१ माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी ) व उच्च्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी ) परीक्षांबाबत | April-May 2021 SSC and HSC examinations
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत एप्रिल-मे २०२१ मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) परीक्षा अंतर्गत लेखी परीक्षा दि.२९/०४/२०२१ ते दि.२०/०५/२०२१ व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षा अंतर्गत लेखी परीक्षा दि.२३/०४/२०२१ ते दि.२१/०५/२०२१ या कालावधीत प्रचलित पध्द्तीने व मंजूर आराखडयानुसार आयोजित करण्यात आलेल्या आहेत.
तसेच इ.१०वी प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व तत्सम परीक्षा दिनांक १२/०४/२०२१ ते दिनांक २८/०४/२०२१ व इ.१२वी प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी तत्सम परीक्षा दिनांक ०५/०४/२०२१ ते दिनांक २२/०४/२०२१ या कालावधीत प्रचलित पध्द्तीने व मंजूर आराखडयानुसार आयोजित करण्यात आलेल्या आहेत.
राज्यात कोविड-१९ विषाणूचा प्रादूर्भाव अद्यापही सुरु आहे, त्या अनुषंगाने उपरोक्त परीक्षा सुरक्षित व सुरळीतपणे तसेच निर्धारित कालाबधीत पार पडण्याच्या दृष्टीने मंडळ स्तरावर विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. तथापि, विविध समाज माध्यम, प्रसार माध्यमादवारे इ१०वी व इ.१२वी परीक्षेसंदर्भात विविध बातम्या व अफवा प्रसारीत होत आहेत. त्यामुळे या परीक्षेशी संबंधित घटकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. मंडळामार्फत सर्व संबंधित घटकांना आवाहन करण्यात येते की, अशा कोणत्याही संभ्रम निर्माण करणाऱ्या गोष्टींवर विश्वास ठेवू नये. यासंदर्भात मंडळामार्फत वेळोवेळी पूर्वीप्रमाणे अधिकृत निवेदने मंडळाच्या संकेतस्थळावर व प्रसिध्दी माध्यमांदवारे प्रसिध्द करण्यात येतील, तसेच परीक्षेच्या अनुषंगाने विभागीय मंडळामार्फत या संदर्भातील लेखी सूचना वेळोवेळी शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांना देण्यात येतात. त्याच सूचना अधिकृत मानण्यात याव्यात.
कोविड-१९ विषाणूच्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर आयोजित एप्रिल-मे २०२१ मधील लेखी/प्रात्यक्षिक परीक्षांसाठी मंडळामार्फत विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक सूचना दोन दिवसात निर्गमित करण्यात येत आहेत. त्याचे काटेकोर पालन करुन सर्व विद्यार्थ्यांनी उपरोक्त परीक्षांना तणावमुक्त वातावरणात सामोरे जावे.
(डॉ. अशोक भोसले)
सचिव,
राज्य मंडळ,पुणे
*****************************************
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी खालीलपैकी कोणत्याही चॅनलला जॉईनव्हा.
If you have any doubts, please let be know.