शिक्षकांसाठी covid-19 या आजाराबाबत उद्बोधन सत्र | Awareness session on covid-19 for teachers
शिक्षकांसाठी covid-19 या आजाराबाबत उद्बोधन सत्र | Awareness session on covid-19 for teachers
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र व YuWaah - युनिसेफ यांच्या सहकार्याने covid-19 साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी यंग वारियर कॅम्पेन हा उपक्रम राबविण्यात येत आहे. 8 वी ते 12 वीच्या वर्गात अध्ययन करणार्या विद्यार्थ्यांनी कौटुंबिक बांधिलकी जोपासण्याचा हेतूने covid-19 या आजाराबाबत आपल्या कुटुंबामधील सदस्यांमध्ये जागृती करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. कुटुंबामध्ये covid-19 या आजाराबाबत जागृती करून योग्य काळजी घेतल्यास या आजारापासून कुटुंबाला सुरक्षित ठेवणे शक्य होणार आहे. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून राज्यातील अनेक कुटुंबांमध्ये जागृती करता येईल,
इयत्ता 8 वी ते 12 वीच्या वर्गांना अध्यापन करणाऱ्या शिक्षकांसाठी दि. 3 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 11 ते 12 या वेळेत ऑनलाईन पद्धतीने उद्बोधन सत्र आयोजित केलेले आहे.
दि. 3 ऑगस्ट 2021 रोजी
सकाळी 11 ते 12
LIVE
COMMENTS