बारावीचा निकाल उद्या | Maharashtra Board HSC Result 2021 महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन २०२१ मध्ये मंडळा...
बारावीचा निकाल उद्या | Maharashtra Board HSC Result 2021
महाराष्ट्र राज्य
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन २०२१ मध्ये मंडळाच्या कार्यपद्धती नुसार तयार करण्यात
आलेला इ.१२वीचा निकाल उद्या दि.०३ ऑगस्ट,२०२१ रोजी दु. ४ : ०० वा. जाहीर होईल.
परीक्षेसाठी नोंदणी
केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संपादित केलेले विषयनिहाय गुण खालील संकेतस्थळावर
उद्या दुपारी ४.०० नंतर उपलब्ध होतील:
2) https://hscresult.11thadmission.org.in
उच्च माध्यमिक शाळा /
कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल या संकेतस्थळावर उपलब्ध होईल.
सर्व विद्यार्थ्यांना मनापासून शुभेच्छा!
१२ वी च्या विद्यार्थ्यांनी आपला परीक्षा नंबर माहित नसेल तर येथे क्लिक करावे व आपला परीक्षा नंबर मिळवावा
बारावीचा निकाल
फॉर्म्युल्यानुसार
सन 2021मध्ये आयोजित करण्यात आलेली उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी) परीक्षा शासन निर्णयानुसार रद्द करण्यात आल्यामुळे
शासन निर्णयातील मूल्यमापन कार्यपध्दती व तरतूदीनुसार व इ.10 वी मधील मंडळाच्या परीक्षेत सर्वाधिक गुण मिळालेल्या तीन
विषयांचे सरासरी गुण, इ.11 वीच्या वार्षिक मूल्यमापनातील विषयनिहाय गुण व इ.12 वीच्या वर्षभरातील अंतर्गत मूल्यमापनातील प्रथम सत्र
परीक्षा,
सराव परीक्षा, सराव चाचण्या, तत्सम मूल्यमापन यातील विषयनिहाय प्राप्त गुण तसेच इ.12 वी चे अंतिम तोंडी/प्रात्यक्षिक/अंतर्गत व तत्सम
मूल्यमापनातील प्राप्त गुण इत्यादींच्या आधारे इ.12 वी साठी भारांशानुसार उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ
महाविद्यालयांमार्फत विद्यार्थ्यांना विषयनिहाय गुणदान करण्यात आले आहे. सदर
गुणदान विचारात घेवून मंडळाने विहित कार्यपध्दतीनुसार सदर परीक्षेचा निकाल तयार
करण्याची प्रक्रिया केलेली आहे.
श्रेणी सुधारण्याची
संधी
दि.2
जुलै 2021 रोजीच्या शासन निर्णयातील तरतूदीनुसार सन 2021
मधील उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12वी) परीक्षेस श्रेणीसुधार योजनेतंर्गत नोंदणी केलेल्या
विद्यार्थ्यांचा निकाल तयार करण्यात आलेला नाही. सदर विद्यार्थ्यांसाठी असलेल्या
दोन संधीमध्ये या परीक्षेची गणना करण्यात येणार नाही. त्यामुळे सदर
विद्यार्थ्यांना पुढील एक /दोन संधी उपलब्ध राहतील
COMMENTS