विद्यार्थ्यांसाठी covid-19 संदर्भातील जनजागृती

 विद्यार्थ्यांनी कौटुंबिक बांधिलकी जोपासण्याचा हेतूने covid-19 या आजाराबाबत आपल्या कुटुंबामधील सदस्यांमध्ये जागृती करणे

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र व YuWaah - युनिसेफ यांच्या सहकार्याने covid-19 साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी यंग वारियर कॅम्पेन हा उपक्रम राबविण्यात येत आहे. 8 वी ते 12 वीच्या वर्गात अध्ययन करणार्‍या विद्यार्थ्यांनी कौटुंबिक बांधिलकी जोपासण्याचा हेतूने covid-19 या आजाराबाबत आपल्या कुटुंबामधील सदस्यांमध्ये जागृती करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. कुटुंबामध्ये covid-19 या आजाराबाबत जागृती करून योग्य काळजी घेतल्यास या आजारापासून कुटुंबाला सुरक्षित ठेवणे शक्य होणार आहे. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून राज्यातील अनेक कुटुंबांमध्ये जागृती करता येईल, या उद्देशाने SCERT, YuWaah- युनिसेफ यांच्या वतीने इयत्ता 8 वी ते 12 वीच्या वर्गात  करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सोमवार दि. 2 ऑगस्ट 2021रोजी सकाळी 11 ते 12 या वेळेत ऑनलाइन पद्धतीने उद्बोधन सत्र आयोजित केलेले आहे.

सोमवार दि. 2 ऑगस्ट 2021

सकाळी 11 ते 12

Live

Post a Comment

If you have any doubts, please let be know.

थोडे नवीन जरा जुने
close