इ.१०वी व इ.१२वी परीक्षेस प्रविष्ट होणा-या खेळाडू विद्यार्थ्यांना सवलतीचे वाढीव गुण
माध्यमिक
शालांत प्रमाणपत्र (इ.१०वी) व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत् (इ.१२वी) परीक्षेस
प्रविष्ट होणा-या खेळाडू विद्यार्थ्यांना सवलतीचे वाढीव गुण देण्यावावत झासनाने
निर्णय घेतलेला आहे. त्यानुसार पात्र खेळाडूंना
क्रीडागुणाची सवलत देण्याबावत संदर्भ क्र.१ ते ५ मधील तरतुदी तसेच
मार्गदर्शक सुचनांनुसार कामकाज करण्यावावतच्या सुचना वेळोवेळी देण्यात आलेल्या
आहेत.
दि.
२१ फेब्रुवारी २०२२ रोजीचे शासनपत्र व संदर्भ क्रमांक ४ अन्वये दिलेल्या
सुचनांवाबत काही क्षेत्रीय
कार्यालयांची गोंधळाची स्थिती
झाल्याने त्यावावत भ्रमणध्वनीवरुन विचारणा होत आहे. क्रीडागुण सवलत कार्यपध्दतीमध्ये एकसुत्रता व सुलभता यावी याकरीता खालीलप्रमाणे
मार्गदर्शक सुचना देण्यात येत आहेत.
> इयत्ता १० वी परिक्षेस प्रविष्ठ असलेल्या खेळाडू विद्यार्थ्यांने इयत्ता ६ वी ते १० वी मध्ये कोणत्याही वर्षात शिकताना क्रीडागुणासाठी पात्र असणारे प्राविण्य मिळविले असल्यास सदर खेळाडू क्रीडागुण सवलतीसाठी पात्र आहे. तथापी संबंधित खेळाडूस इयत्ता ६ वी इयत्तेत शिकत असताना मिळविलेल्या प्राविण्याचा लाभ देण्यासाठी तो इयत्ता ७ वी अथवा ८ वी मध्ये शिकत असलेल्या वर्षात आयोजित स्पर्धात किमान सहभागी होणे आवड्यक आहे.तसेच इयत्ता ७ वी ते १० वी मध्ये शिकत असलेल्या वर्षात प्राविण्य मिळविले असल्यास सदर खेळाडूस शिकत असलेल्या वर्षात क्रीडा स्पर्धातील सहभागाची अट लागू राहणार नाही,
>
इयत्ता १२ वी परिक्षेस प्रविष्ठ
असलेल्या खेळाडू विद्यार्थ्यांने इयत्ता ६ वी ते १२ वी मध्ये कोणत्याही वर्षात शिकताना क्रीडागुणासाठी पात्र असणारे प्राविण्य मिळविले
असल्यास सदर खेळाडू क्रीडागुण
सवलतीसाठी पात्र आहे. तथापी
संबंधित खेळाडूस इयत्ता ६ ते ८ वी इयत्तेत शिकत असताना मिळविलेल्या
प्राविण्याचा लाभ देण्यासाठी तो इयत्ता ९ वी अथवा १० वी मध्ये शिकत असलेल्या वर्षात आयोजित स्पर्धात किमान सहभागी होणे आव्यक आहे. तसेच इयत्ता ९ वी
ते १२ वी मध्ये शिकत असलेल्या वर्षात प्राविण्य मिळविले असल्यास सदर
खेळाडूस शिकत असलेल्या वर्षांतील सहभागाची अट लागू राहणार नाही.
>
इयत्ता १२ वी परिक्षेस
प्रविष्ठ असलेल्या खेळाडू विद्यार्थ्यांने इयत्ता १० वी मध्ये क्रीडागुणांची सवलत घेतली असल्यास अशा खेळाडू
विद्यार्थ्यांना इयत्ता ६ ते १० वी मध्ये शिकत असताना मिळविलेल्या क्रीडाप्राविण्यास इयत्ता १२ वी करीता
क्रीडागुणांची सवलत देय असणार नाही.
अश्या खेळाडू विद्यार्थ्यांकडे इयत्ता ११ वी अथवा १२ वी मध्ये
शिकत असताना मिळविलेली क्रीडागुण मिळण्यासाठीची पात्र
क्रीडा कामगिरी असणे आवश्यक आहे. अशा खेळाडूं विद्यार्थ्यांना शिकत असलेल्या
वर्षातील क्रीडा स्पर्धांतील सहभागाची अट लागू राहणार नाही.
> इयत्ता १२ वी परिक्षेस प्रविष्ठ असलेल्या खेळाडू विद्यार्थ्यांने इयत्ता १० वी मध्ये क्रीडागुण सवलतीचा लाभ घेतला असल्यास अशा खेळाडू विद्यार्थ्यांकडे इयत्ता १० वी मध्ये क्रीडागुण सवलतीचा लाभ घेतलेल्या खेळाव्यतीरिक्त अथवा प्राविण्याव्यतीरिक्त अन्य खेळातील अथवा अन्य स्तरावरील क्रीडागुण सवलतीसाठी पात्र कामगिरी असली तरीही इयत्ता १२ वी मध्ये पुनश्च क्रीडागुणांचा लाभ देता येणार नाही. त्यासाठी इयत्ता ११ वी अथवा १२ वी मध्ये शिकत असतानाची पात्र क्रीडा कामगिरी असणे आवश्यक आहे.
If you have any doubts, please let be know.