शिक्षक १३ जून पासून शाळेत, मात्र विद्यार्थी १५ जून पासून शाळेत येणार

शिक्षक १३ जून पासून शाळेत मात्र विद्यार्थी १५ जून पासून शाळेत येणार

शिक्षक १३ जून पासून शाळेत मात्र विद्यार्थी १५ जून पासून शाळेत येणार

सदर शासन निर्णयानुसार संपूर्ण राज्यातील शाळांच्या कालावधीमध्ये एकवाक्यता व सुसंगती आणण्यासाठी आगामी शेक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये शाळा सुरु करण्याबाबत निर्देश निर्गमित केलेले आहेत.

त्यानुसार शेक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये दुसरा सोमवार दि.१३ जून २०२२ रोजी शाळा सुरु करण्यात येतील तसेच जून महिन्यातील विदर्भाचे तापमान विचारात घेता तेथील शाळा चौथा सोमवार दि.२७ जून २०२२ रोजी सुरु होतील. याअनुषंगाने पुढीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत.

१) दि.१३ जून २०२२ ते १४ जून २०२२ रोजी शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहून शाळेची स्वच्छता करणे, शाळेचे सौंदर्यीकरण करणे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कोविड-१९ प्रार्दुभाव तसेच आरोग्यविषयक बाबीचे अनुषंगाने उद्बोधन करणे याचे आयोजन करण्यात यावे. दि.१५ जून २०२२ पासून विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात शाळेत येण्याच्या सूचना निर्गमित करण्यात याव्यात तसेच विदर्भातील शाळांबाबत दि.२४ जून २०२२ ते २५ जून २०२२ रोजी शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहून शाळेची स्वच्छता करणे, शाळेचे सौंदर्यीकरण करणे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कोविड-१९ प्रादुभाव तसेच आरोग्यविषयक बाबीचे अनुषंगाने उद्बोधन करणे याचे आयोजन करण्यात यावे. दि.२७ जून २०२२ पासून विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात शाळेत येण्याच्या सूचना निर्गमित करण्यात याव्यात.

२) शासनाकडून, आरोग्य विभागाकडून, स्थानिक आपत्ती कक्षाकडून वेळोवेळी निर्देश/सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत तसेच यापुढे करण्यात आल्यास त्यांचे काटेकोरपणे पालन होईल याची दक्षता घ्यावी.

३) शाळेमध्ये येणाऱ्या मुलांचे/पालकांचे कोविड-१९ प्रादुभावाच्या अनुषंगाने प्रबोधन/उद्‌बोधन करण्यात यावे.


***************************

नवनवीन शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी  खालीलपैकी कोणत्याही चॅनलला जॉईन व्हा.

1) WhatsApp Group (New Update)

    Online Shikshak ASB 13

https://chat.whatsapp.com/KCJZpeluBB57Rltv45ZWz6

2) Telegram Channel

  https://t.me/onlineshikshakasb

3) Facebook Page

 https://www.facebook.com/onlineshikshakasb

If you have any doubts, please let be know.

थोडे नवीन जरा जुने

ads

ads

نموذج الاتصال

close