“चला वाचूया शिक्षणमंत्री यांच्या संगे” - महावाचन चळवळ
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान
अंतर्गत “चला वाचूया शिक्षणमंत्री यांच्या संगे” - महावाचन
चळवळ
राज्यातील विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी
लागावी म्हणून महाराष्ट्र शासन, शालेय शिक्षण व
क्रीडा विभागाचा अभिनव उपक्रम "चला वाचू या शिक्षण मंत्री यांच्या संगे
!"
शिक्षणमंत्र्यांची शिक्षणाप्रती तळमळ ऐकु, समजू महावाचन चळवळ...
दि. ०३ मार्च २०२४, रविवार
वेळ : सकाळी १०.५० ते ११.१५
मा.ना. दीपक केसरकर,
मंत्री, शालेय शिक्षण,महाराष्ट्र
राज्य हे राज्यातील सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि मुख्याध्यापक, सर्व शिक्षण विभागातील
अधिकारी , कर्मचारी, नागरिक यांना
महावाचन चळवळ याबाबत “चला वाचूया शिक्षणमंत्री यांच्या संगे!”
या लाइव्ह कार्यक्रमात संबोधित करणार आहेत.
यासाठी
वरील प्रत्येक विद्यार्थी, शिक्षक, पालक,
शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचारी या प्रत्येकाने
सदर संदेश वेगवेगळ्या मोबाईलवर पूर्ण वेळ पहावयाचा आहे.
सदर
यु ट्यूब लिंक वर वेळेपूर्वी १० मिनिटे जॉइन व्हायचे आहे. व्हिडीओ पूर्ण झाल्यावरच
धन्यवाद चा संदेश आल्यावर आपण यु ट्यूब बंद करू शकता.
सदर ऑनलाईन लाइव्ह संबोधन कार्यक्रम
पाहताना सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि मुख्याध्यापक, सर्व शिक्षण विभागातील
अधिकारी, कर्मचारी, नागरिक आपले नाव व
शाळा, ऑफिस तपशील व अभिप्राय हे कॉमेंट बॉक्स मध्ये टाकायचा
आहे.
शालेय शिक्षण विभाग,
महाराष्ट्र शासन,
मुंबई
If you have any doubts, please let be know.