MAHA TET 2026 परीक्षा पुढे ढकलली | अधिकृत MSCE नोटीस जाहीर | नवीन परीक्षा तारीख कधी?

🚨 MAHA TET 2026 परीक्षा पुढे ढकलली – अधिकृत प्रसिद्धीपत्रक

दिनांक : 27 जून 2026


महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांनी प्रसिद्ध केलेल्या अधिकृत माहितीनुसार, दि. 28 जून 2026 रोजी आयोजित करण्यात आलेली महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) 2026 पुढे ढकलण्यात आली आहे.

परीक्षा पुढे ढकलण्याचे कारण

  • भिवंडी येथे गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकला.
  • तपासात काही व्यक्तींकडे TET प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांशी साधर्म्य असलेले प्रश्न आढळले.
  • प्रकरणाची गंभीर दखल घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला.
  • परीक्षेची पारदर्शकता व सुरक्षितता कायम ठेवण्यासाठी परीक्षा पुढे ढकलण्यात आली.

महत्त्वाची सूचना

नवीन परीक्षा दिनांक, प्रवेशपत्र व इतर अद्ययावत माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल.

उमेदवारांनी अफवांवर विश्वास ठेवू नये.
अधिकृत माहिती मिळेपर्यंत परीक्षा परिषदेच्या सूचनांची प्रतीक्षा करावी.



Online Shikshak ASB
शिक्षण, TET, स्पर्धा परीक्षा आणि शैक्षणिक अपडेट्ससाठी आमच्यासोबत राहा.

If you have any doubts, please let be know.

थोडे नवीन जरा जुने

ads

ads

نموذج الاتصال

close