दहावीच्या रद्द झालेल्या भूगोलाच्या
गुणांचा फॉर्म्युला ठरला || SSC RESUIT 2020
दहावीचा भूगोलाचा पेपर कोरोनाचा
वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शिक्षण विभागाकडून रद्द करण्यात आला होता.
भूगोल विषयाचा पेपर रद्द केल्यामुळे
विद्यार्थी व पालकांमध्ये निकालाबाबत संभ्रमता होती. भूगोल विषयाची गुणपद्धती कशी
असेल? विद्यार्थ्यांचे नुकसान तरी होणार नाही ना? असे विविध प्रश्न पालक व
विद्यार्थ्यांना सतावत होते.
अखेर राज्य माध्यमिक व उच्च
माध्यमिक शिक्षण मंडळाने हा तिढा सोडवला असून इतर विषयांच्या लेखी परीक्षांच्या
गुणांच्या सरासरी इतके गुण भूगोल विषयाला देण्यात येणार असल्याची माहिती मंडळाच्या
अध्यक्षा शकुंतला काळे यांनी दिली.
*******************SSC RESULT 2020********************
******************SSC RESULT 2020********************
सध्या भूगोलाच्या गुणपद्धतीचा प्रश्न
मिटलेला आहे. त्यामुळे उत्तरपत्रिका तपासणीच्या कामाला वेग येणार असून जूनच्या
पहिल्या आठवड्यात शक्य नसले तरी शक्य तितक्या लवकर निकाल लावणार असल्याचे शिक्षण
विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालकांना नक्कीच मोठा दिलासा
मिळालेला आहे.
भूगोलाच्या रद्द झालेल्या पेपरची
गुणपद्धती कशी असावी यासाठी मंडळाकडून विहित कार्य पद्धती वापरण्यात आली असून
मंडळाने तयार केलेला प्रस्ताव हा शासनाच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता.
त्याला शासनाची मंजुरी मिळाली आहे.
या गुण पद्धतीनुसार भूगोलाचे गुण देण्यात येणार
आहेत या गुणपद्धती साठी केवळ विद्यार्थ्यांनी दिलेले लेखी पेपरचेच गुण ग्राह्य
धरण्यात येणार आहेत असे मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी सांगितले.
Tags
SSC IMP

