श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय भोर ची अवंतिका महांगरे भोर तालुक्यात प्रथम
एस.एस.सी. मार्च
2020 परीक्षेमध्ये श्री. स्वामी विवेकानंद
शिक्षण संस्था संचलित श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय भोर मधील कु. अवंतिका हरी महांगरे
99.40% गुण मिळवून भोर तालुक्यात प्रथम,
तसेच श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सर्व शाखांमध्ये
दुसरी, तर पुणे विभागात प्रथम क्रमांक मिळवून मानाचा तुरा रोवला
आहे.
तसेच कु. समीक्षा ज्ञानेश्वर चिकणे
95.40 % गुण मिळवून शाळेत दुसरा क्रमांक व कु. वैष्णवी भगवान घोडेकर 90.60% गुण मिळवून
तिसरी आली आहे.
प्रथम
कु. अवंतिका हरी महांगरे 99.40%
********************************************
द्वितीय
कु. समीक्षा ज्ञानेश्वर चिकणे 95.40 %
********************************************
तृतीय
कु. वैष्णवी भगवान घोडेकर 90.60%
गुणवंत विद्यार्थ्यांचे
शाळेचे प्राचार्य मा. पाटील आर. के. सर व सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर
सेवक वृंद यांनी अभिनंदन केले. तसेच पुणे विभाग प्रमुख श्री. गवळी सर व विद्या समिती
सचिव श्री. सुळगेकर सर यांनीही गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
कु. अवंतिका महांगरे हिने
आपल्या मनोगतामध्ये यशाचे गमक सांगताना विद्यालयांमध्ये प्रामुख्याने राबवलेले टॅलेंट
बॅच, तज्ञ शिक्षकांची वैयक्तिक मार्गदर्शन हे उपक्रम व पालकांचे सहकार्य लाभल्याचे सांगितले.
तसेच संस्थेचे कार्याध्यक्ष मा. श्री. अभयकुमार
साळुंखे साहेब व सचिवा सौ. शुभांगीताई गावडे यांनी संपर्क साधून गुणवंत विद्यार्थ्यांचे
व पालकांचे अभिनंदन केले.








If you have any doubts, please let be know.