बालदिन Online साजरा होणार , विविध स्पर्धांचे नियोजन (#baldivas2020)

 बालदिन Online साजरा होणार , विविध स्पर्धांचे नियोजन

#baldivas2020


कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शाळा सध्या बंद असून ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. त्यामुळे 14 नोव्हेंबर बालदिन हा सोशल मीडियाच्या माध्यमातून साजरा करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे.

राज्यातील सर्व शाळांमधील पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी 8 ते 14 नोव्हेंबर दरम्यान भारताचे तत्कालीन पंतप्रधान दिवंगत पंडित नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन सप्ताह साजरा करण्यात येईल.

  • पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांना मी नेहरू बोलतोय या विषयावर तीन मिनिटाचा व्हिडिओ अपलोड करायचा आहे.
  • तिसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना पत्र लेखन हा विषय असून त्यांना चाचा नेहरूंना पत्र लिहायचे आहे.
  • सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना कविता वाचन आणि नेहरू च्या जीवनावर एकपात्री प्रयोग करायचा आहे.

  • नववी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी स्वातंत्र्यसंग्रामातील नेहरूंच्या जीवनावरील पोस्टर तयार करणे व निबंध स्पर्धा आहे.

...असे उपक्रम शिक्षण विभागाकडून राबविण्यात येतील.

 पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांना नेहरूशी संबंधित कथा-कविता, प्रसंग सादर करणे या माध्यमातूनही संमेलन आयोजित करता येईल. विद्यार्थ्यांनी तयार केलेले व्हिडिओ निबंध कविता पत्रलेखन ई-संमेलनाचे फोटो हे पालक शिक्षक यांच्या फेसबुक अकाऊंटवरून  #baldivas2020 या हॅशटॅगचा वापर करुन अपलोड करायचे आहेत.

 विद्यार्थ्यांना त्यांचे व्हिडीओ व फोटो हे इंस्टाग्राम, ट्विटरवर #baldivas2020 हॅशटॅगचा वापर करुन अपलोड करता येतील. विशेष म्हणजे या उपक्रमासाठी तालुका जिल्हा व राज्य पातळीवर प्रथम तीन क्रमांक देण्यात येणार असून विद्यार्थ्यांना रोख रक्कम व प्रशस्तीपत्र देण्यात येतील त्यासाठी तालुका जिल्हा आणि राज्यस्तरीय समितीची स्थापना करण्यात येईल.

*******************************************************

नवनवीन शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी  खालीलपैकी कोणत्याही चॅनलला जॉईन व्हा.



If you have any doubts, please let be know.

थोडे नवीन जरा जुने

ads

ads

نموذج الاتصال

close