SSC, HSC Exam 2022: परीक्षेचे टेन्शन आलंय ? १० वी व १२ वी च्या विद्यार्थ्यांना फोनवरून समुपदेशन उपलब्ध

१० वी व १२ वी च्या विद्यार्थ्यांना फोनवरून समुपदेशन उपलब्ध 

राज्यातील दहावी व इ. बारावीच्या (SSC And HSC) विद्यार्थ्यांना मार्च/एप्रिल २०२२  परीक्षेला सामोरे जाताना येणाऱ्या ताण तणावासाठी मार्गदर्शन व समुदेशन करण्यासाठी @scertmaha तर्फे प्रशिक्षित मार्गदर्शक, समुपदेशकांची सल्ला व मार्गदर्शन सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.

SSC, HSC Exam 2022: परीक्षेचे टेन्शन आलंय ? १० वी व १२ वी च्या विद्यार्थ्यांना फोनवरून समुपदेशन उपलब्ध

प्रशिक्षित मार्गदर्शक व समुपदेशकांची यादी https://maa.ac.in/index.php?tcf=counselors_list या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या सुविधेचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक मा. एम. देवेंदर सिंह यांनी केले आहे.

प्रत्येक जिल्ह्यानुसार  मार्गदर्शक व समुपदेशकांची यादी संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. या यादीत विभागीय मंडळाचे नाव, समुपदेशकाचे नाव, त्यांची शाळा आणि त्यांचा व्हॉट्स अप आणि मोबाइल क्रमांक यांचा या यादीत समावेश आहे. राज्यभरातल्या अशा ४१० समुपदेशकांच्या नाव आणि संपर्क क्रमांकांची यादी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

ज्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या संदर्भात काही शंका आहेत त्या विद्यार्थ्यांनी सबंधित विभागातील समुपदेशकाशी संपर्क साधावा व आपल्या शंकांचे निरसन करून घ्यावे.

दहावीच्या सर्व विषयांची प्रश्न पेढी (Click Here)




*************************************

नवनवीन शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी  खालीलपैकी कोणत्याही चॅनलला जॉईन व्हा.

1) WhatsApp Group (New Update)

    Online Shikshak ASB 11

     https://chat.whatsapp.com/C2P1uSdQpw6Iq8JDC9lIMj

2) Telegram Channel

     https://t.me/onlineshikshakasb

3) Facebook Page

     https://www.facebook.com/onlineshikshakasb

*************************************

If you have any doubts, please let be know.

थोडे नवीन जरा जुने

ads

ads

نموذج الاتصال

close