दहावी नापास झालेल्या कोणत्या विद्यार्थ्यांना अकरावीला प्रवेश घेता येईल ?
ज्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर ‘G’ असा शेरा आहे, अशा अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना अकरावीसाठी ‘एटीकेटी’तून प्रवेश घेता येणार नाही. पण, गुणपत्रिकेवर ‘H’ शेरा असलेले विद्यार्थी मात्र अकरावी प्रवेशासाठी अर्ज करू शकणार आहेत. दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशासाठी अर्ज करताना १० कॉलेज पसंतीक्रमानुसार निवडावे लागणार आहेत. त्यानुसार त्यांना प्रवेश मिळेल. प्रवेश अर्ज करण्यासाठी माध्यमिक शिक्षण विभागाने https://mahafyjcadmissions.in हे संकेतस्थळ उपलब्ध करून दिले आहे.
तसेच दहावीसाठी ATKT लागू केली आहे. जर एखादा विद्यार्थी एक किंवा दोन विषयांत अनुत्तीर्ण झाला तरी त्याला 11 वीमध्ये प्रवेश दिला जातो. याला allowed to keep terms म्हणजेच ATKT दिली जाते. यानुसार तो विद्यार्थी अकरावीत अॅडमिशन घेऊ शकतो. मात्र बारावीत प्रवेश घेण्यापूर्वी त्याला दहावी उत्तीर्ण होणे गरजेचे असेल. हा विद्यार्थी जून-जुलैची २०२५ किंवा फेब्रुवारी मार्च २०२६ ची परीक्षा जर तो उत्तीर्ण झाला आणि अकरावीची परीक्षा उत्तीर्ण झाला तर तो बारावी परीक्षेला प्रवेश घेण्यास पात्र ठरु शकतो, असेही शरद गोसावींनी म्हटले.
