फिट इंडिया चळवळी अंतर्गत Khelo India National Fitness Assessment Programme साठी शाळांची नोंदणी करणे.
- फिट इंडिया चळवळीचा प्रारंभ मा पंतप्रधान महोदय यांच्या हस्ते राष्ट्रीय क्रीडा दिनी दि. 29 ऑगस्ट 2019 रोजी झालेला आहे. फिट इंडिया चळवळीद्वारे भारत आणि भारतीयांना सन 2022 पर्यंत तंदुरुस्त बनवण्याचा संकल्प व्यक्त केला आहे.
- दैनंदिन जीवनात तंदुरुस्तीचे महत्व वाढविणे हा या चळवळीचा प्रमुख उद्देश आहे. या चळवळी अंतर्गत राज्यातील सर्व माध्यमांच्या, सर्व व्यवस्थापनाच्या पहिली ते बारावीच्या शाळांमधील शालेय विद्यार्थ्यांची तंदुरुस्ती बाबत शालेय स्तरावर चाचणी घेण्यात येणार आहे.
- चाचणीद्वारे प्राप्त झालेली माहिती खेलो इंडिया च्या ॲप वर अपलोड करावयाची आहे. तसेच या विषयाबाबतची सर्व प्रशिक्षणे ऑनलाइन मोडमध्ये या ॲपच्या माध्यमातून घेतली जाणार आहेत. याकरिता प्रथमता राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या पहिली ते बारावीच्या शाळांनी आपली नोंदणी
https://schoolfitness.kheloindia.gov.in/StaticPage/LandingPage.aspx
या पोर्टल वर जाऊन करावयाचे
आहे. शाळा नोंदणी बाबतच्या सविस्तर सूचना सोबतच्या प्रपत्र मध्ये दिलेल्या आहेत.
********************************************
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी खालीलपैकी कोणत्याही चॅनलला जॉईन व्हा.
1) WhatsApp Group (New Update)
2) Telegram Channel
3) Facebook Page
If you have any doubts, please let be know.