शैक्षणिक दिनदर्शिका ( प्राथमिक व माध्यमिक ) डिसेंबर २०२० ते एप्रिल २०२१
नमस्कार विद्यार्थी मित्रहो ,
सध्या covid-19 या रोगामुळे संपूर्ण जग विविध समस्यांना सामोरे जात आहे. त्याला शिक्षण क्षेत्रही अपवाद नाही. काही भागातील शाळा सध्या सुरु आहेत. काही भागातील शाळा अजूनही सुरु नाहीत. शिकणे जास्तीत जास्त समृद्ध करता येऊ शकेल का याचा विचार शासन पातळीवरही होत आहे.
शैक्षणिक दिनदर्शिका विद्यार्थ्यांनी, पालक आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली वापरावयाचे आहे. तसेच शिक्षकांनी फोन कॉल व्हाट्सअप या माध्यमातून विद्यार्थी आणि पालक यांच्या संपर्कात राहून शैक्षणिक दिनदर्शिकेच्या साह्याने मुलांचे शिक्षण आनंददायी कसे होईल यासाठी प्रयत्न करावयाचा आहे. विद्यार्थ्यांनी शैक्षणिक दिनदर्शिकेचा चा वापर करत असताना पालक आणि घरातील इतर वडीलधारी मंडळी, तसेच मोठे बहिण भाऊ यांच्या देखरेखीखाली अध्ययन साहित्य वापरावे. शैक्षणिक दिनदर्शिकेमध्ये अध्ययन स्त्रोत म्हणून दीक्षा ॲप वरील संबंधित घटकाचे ई- साहित्य दिले आहे. या साहित्याचा वापर संदर्भ म्हणून करण्यापूर्वी शिक्षकांशी चर्चा करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे शिक्षकांच्या सूचनेनुसार पाठ्यपुस्तकांचा ही वापर आवश्यक आहे.
तरी खालील इयत्ता प्रमाणे आपापल्या वर्गाची दिनदर्शिका पहा व त्यातील दिलेल्या लिंक नुसार दीक्षा ॲप वरील व्हिडिओ व शैक्षणिक साहित्य पहावे.
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी खालीलपैकी कोणत्याही चॅनलला जॉईन व्हा.
1) WhatsApp Group (New Update)
2) Telegram Channel
3) Facebook Page


If you have any doubts, please let be know.