इ. ५ वी व इ. ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा फॉर्म भरणे सुरु व परीक्षेची तारीख जाहीर | 5th and 8th Scholarship Examination Form Filling Started and Exam Date Announced
पूर्व
उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन
प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, शासकीय विद्यानिकेतन
प्रवेश परीक्षा (इ. ५ वी) आणि पूर्व
माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) दि. २५ एप्रिल, २०२१ रोजी आयोजित
करणेबाबतची अधिसूचना...
शासनमान्य
शाळांमधून सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात इयत्ता ५ बी मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमधील
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन
प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा व शासकीय
विद्यानिकेतन प्रवेश परीक्षेमध्ये प्रविष्ठ
होण्यासाठी तसेच इयत्ता ८ वी
मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमधील पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेस प्रविष्ठ
होण्यासाठी अधिसूचनेत नमूद केलेल्या अटी पूर्ण करणाऱ्या व या परीक्षेस प्रविष्ठ
होण्यास इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांची ऑनलाईन आवेदनपत्र परिषदेच्या http://www.mscepune.in व https://www.mscepuppss.in या
संकेतस्थळावर दि. ०९/०३/२०२१ रोजी पासून उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
उपरोक्त
परीक्षा दि. २५ एप्रिल, २०२१ रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व
जिल्हयांमध्ये एकाच वेळी घेण्यात येईल. परीक्षेचे वेळापत्रक व परीक्षेची सविस्तर
माहिती सोबतच्या अधिसूचनेत नमूद करण्यात..
अधिक माहितीसाठी खालील अधिसूचना वाचा.
*************************************
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी खालीलपैकी कोणत्याही चॅनलला जॉईनव्हा.
If you have any doubts, please let be know.